बाळासाहेबांच्या शिवसेनेचे इतके सरपंच, नवनियुक्त सरपंचांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमच्या तीन महिन्यांच्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे इतके सरपंच, नवनियुक्त सरपंचांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
नवनियुक्त सरपंचांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 9:18 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ग्रामपंचायत निकालाची वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्या मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला सरपंच निवडून आणले, हे राज्यातल्या जनतेला कळलं पाहिजे. त्यासाठी काल दीडशे आणि आज 51 आणि उद्या सुद्धा काय उर्वरित सरपंच इथे येतील. टोटल 243 सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे निवडून आले आहेत, हा आकडा आणखी वाढणार आहे. या सगळ्या सरपंचांचं मी स्वागत केलं आहे.

आमच्या तीन महिन्यांच्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे. हे सरकार झटपट निर्णय घेणारे सरकार आहे. ग्रामीण भागात सुद्धा एक विश्वास निर्माण झाला आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळणार आहे. आमचे 243 सरपंच असताना आमची चुकीची आकडेवारी दाखवत होते.

भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी मला उत्तर देण्याची गरज नाही. गृह विभाग त्याचे उत्तर देईल, कोणी हल्ला केला काय ते ? परतीच्या पावसामुळे जे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे करा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही मदत केली आहे.

विविध पातळीवर पंचनामे करण्याचा आम्ही सांगितला आहे. त्यानुसार त्यांना मदत मिळेल शेतकऱ्यांना वाऱ्यावर हे सरकार सोडणार नाही. दिवाळी सुद्धा उत्साहात झाली पाहिजे. यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. त्यामध्ये रवा, साखर, तेल, चण्याची डाळ अशी चार वस्तू 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

26-11 च्या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अपग्रेड केलेली आहे. अशा धमक्या जरी आल्या तरी आमचा गृह विभाग पोलीस यंत्रणा सक्षम आहे त्यांना करारा जबाब देण्यासाठी. फक्त नागरिकांनी सतर्क राहण्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पोलीस यंत्रणेमध्ये अत्याधुनिक सर्वसामग्री आहेत ते सगळं केलेला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.