Anjali Damania | अंजली दमानिया राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला भेटल्या, आरोपांचा नवीन बॉम्ब फुटणार?

Anjali Damania | महाराष्ट्राच्या राजकारणात आरोपांचा नवीन बॉम्ब फुटणार?. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यामुळे या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Anjali Damania | अंजली दमानिया राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला भेटल्या, आरोपांचा नवीन बॉम्ब फुटणार?
Anjali Damania
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 2:50 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अंजली दमानिया हे नाव सर्वांनाच माहित आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही नेत्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. त्या नेत्यांची या आरोपातून सुटका झाली. आम आदमी पार्टीपासून अंजली दमानिया यांनी त्यांच्या राजकीय इनिंगची सुरुवात केली होती. त्यांनी भाजपा नेते नितीन गडकरी यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात नागूपर लोकसभा मतदारसंघातून अंजली दमानिया यांचा पराभव झाला. 2015 मध्ये अंजली दमानिया यांनी आपला सोडचिठ्ठी दिली.

आता अंजली दमानिया फार चर्चेत नसतात. पण नुकतीच त्यांनी एक भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार आणि अंजली दमानिया यांची अतूल सावे यांच्या बंगल्याबाहेर भेट झाली. दोघांमध्ये 10 मिनिट गप्पा रंगल्या.

‘आम्ही चुकलो, तर आमचीही वाजवा’

अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यामुळे या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आम्ही चुकलो तर आमचीही वाजवा असा टोला रोहीत पवार यांनी अंजली दमानिया यांना लगावला. रोहित पवार आणि अंजली दमानिया यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आरोपांचा कुठला नवीन बॉम्ब फुटणार? कुठला राजकीय नेता अडचणीत येणार? अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

‘होय, मी बालिश आहे’

दरम्यान राज्यात कुठल्याही व्यक्तीला विचारा की, “एखादा थोर व्यक्ती संघर्ष करत असेल, तर तुम्ही आजोबासोबत राहणार की सोडून जाणार?. मी माझी भूमिका बदललेली नाही” असं रोहित पवार म्हणाले. “सुनिल तटकरेंना मी सांगतो की, होय, मी बालिश आहे, लहान आहे, पण आम्ही विचारांनी मोठे आहोत” असं रोहित पवार म्हणाले.

इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना कोटींची कामे

“सीएम कुणाला बनवायचय, त्याला बनवा. पण दुष्काळ जाहीर करा, 19 जिल्हे प्रभावित आहेत, 10 जिल्हे बिकट परिस्थितीत आहेत, तुम्ही 2 कोटींचे पोस्टर लावता, शेतकऱ्यांना काही देत नाही असा अजितदादांना टोला लगावला. तुम्ही सत्तेत आहात, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना कोटींची कामे देत आहात, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका” असं रोहित पवार म्हणाले. ‘मोदींच येणार हा भाजपचा अहंकार’

“पुणे नगर इथे हलाकिची परिस्थिती आहे. इतर तालुक्यातही समस्या आहेत. दादांनी याकडे लक्ष द्यायला हवं. कुठेही बैठक घ्या, कुणाच्याही घरी घ्या पण निर्णय घ्या. मोदींच येणार हा भाजपचा अहंकार आहे. 2024 ला परिवर्तन अटळ आहे. भाजपला अहंकाराची किंमत मोजावी लागणार” असं रोहित पवार म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.