शेतकरी आंदोलनासोबत उभं राहून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ठराव करा, प्रतिभा शिंदेंची शरद पवारांकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनासोबत उभं राहावं. तसेच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात स्पष्ट ठराव करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी केलीय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनासोबत उभं राहावं. तसेच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात स्पष्ट ठराव करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी केलीय. त्यांनी आज (18 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेतली. तसेच आगामी काळात याबाबत भूमिका घेण्याची विनंती केली. याबाबत त्यांनी निवेदन देत सविस्तर चर्चा केली (Social activist Pratibha Shinde demand clear support to Farmer protest from NCP Sharad Pawar).
अलीकडेच महाराष्ट्र सरकारने राज्याच्या कृषी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यातील सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर किसान मोर्चाच्या राष्ट्रीय समिती सदस्य प्रतिभा शिंदे यांनी संबंधित नेत्यांसमोर आपली भूमिका मांडली.
“शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे व कायदे यावर भूमिका घेत निर्णय घ्या”
प्रतिभा शिंदे म्हणाल्या, “शेतकरी कष्टकरी यांच्या हितासाठी कृषी कायद्यात सुधारणा आवश्यक आहेत. त्या तातडीने होणे गरजेचे आहे. यात नेमक्या कोणत्या सुधारणा असाव्यात याबाबत आम्ही काही ठोस प्रस्ताव सादर करु. त्यानुसार अधिवेशनापूर्वी चर्चा करून शेतकऱ्यांची भूमिका, अपेक्षा व अडचणी समजून घेऊ. त्यानंतरच सरकारने राज्यस्तरीय कृषी संबंधी सुधारणेस अंतिम रूप द्यावे. तसेच शेतकऱ्यांच्या हिताची काही नवी धोरणे व आवश्यक कायदे यावर देखील भूमिका आणि निर्णय घ्यावा.”
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस महत्वाची भूमिका बजावेल, अशी आशा यावेळी प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारने नुकताच शेतकरी बांधवांना केंद्रस्थानी ठेऊन राज्याच्या कृषी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल प्रतिभा शिंदे यांनी शरद पवार आणि आघाडी सरकारचं अभिनंदन केलं. त्यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, विजया चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी प्रतिभा शिंदेंनी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते.
हेही वाचा :
आमदार संजयमामा शिंदेंविरोधात शेतकरी आक्रमक, पुण्यातील पंजाब बँकेवर अर्धनग्न आंदोलन करत मागितली भीक!
PHOTOS : पंजाबमधील किसान सभेच्या शेतकऱ्यांची दुसरी तुकडी दिल्लीच्या सिंघु सीमेवर परतली!
PHOTOS : 6 महिने उलटूनही मागण्या मान्य नाही, शेतकऱ्यांचा देशभरात एल्गार, महाराष्ट्रातही पडसाद
व्हिडीओ पाहा :
Social activist Pratibha Shinde demand clear support to Farmer protest from NCP Sharad Pawar