तळेगावातील सोमाटणे टोलनाक्याला विरोध, स्थानिक ‘कृष्णकुंज’वर, राज ठाकरेंचा म्हैसकरांना फोन

राज ठाकरे यांनी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला (Talegaon Toll Naka Raj Thackeray)

तळेगावातील सोमाटणे टोलनाक्याला विरोध, स्थानिक 'कृष्णकुंज'वर, राज ठाकरेंचा म्हैसकरांना फोन
सोमाटण्यातील टोल नाका बंद करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिक 'कृष्णकुंज'वर
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 1:57 PM

मुंबई : तळेगावच्या सोमाटणे भागातील विविध पक्षांचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी आले होते. सोमाटण्यातील टोल नाका बंद करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. 21 तारखेला उग्र आंदोलन करणार असल्याची माहितीही या सदस्यांनी दिली. (Somatane Talegaon Toll Naka Local residents meet MNS Raj Thackeray)

राज ठाकरे यांनी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि उद्यापर्यंत माहिती देण्यास सांगितले. गेली 15 वर्ष सोमाटणे भागातील स्थानिक रहिवाशी टोलनाका बंद करण्याची मागणी करत आहेत. पण कंत्राट 11 वर्षांसाठी दिल्याचं सांगत प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप आहे.

कोरोना काळात पुन्हा एकदा नवे कंत्राट देण्यात आले आणि ते आयआरबीने जिंकले. त्यामुळे हा टोलनाका बंद करा या मागणीसाठी नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

रुपाली पाटील यांची टोलनाक्यावर वादावादी

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची नुकतीच किणी टोल नाक्यावर फास्टॅगवरुन वादावादी झाली. रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास रुपाली पाटील पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या त्यावेळी किणी टोल नाक्यावर ही वादावादी झाली. या संपूर्ण घटनेचं फेसबुक लाईव्ह करण्यात आलं आहे.

फास्टॅग लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक होते. त्यावेळी रुपाली पाटील किणी टोल नाक्यावरुन पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या. पण टोन नाक्यावर प्रचंड मोठी रांग लागली होती. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी थोडी वादावादी झाल्याचंही पाहायला मिळालं. तेव्हा रुपाली पाटील यांच्या मदतीला टोल नाक्यावरील अन्य वाहन चालकही आल्याचं पाहायला मिळालं. (Somatane Talegaon Toll Naka Local residents meet MNS Raj Thackeray)

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी जामीन

राज ठाकरे यांना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. राज ठाकरेंना 15 हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, पुढील सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे

संबंधित बातम्या :

VIDEO | फास्टॅगवरुन मनसे नेत्या रुपाली पाटील यांची किणी टोल नाक्यावर वादावादी

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे यांना सशर्त जामीन मंजूर

(Somatane Talegaon Toll Naka Local residents meet MNS Raj Thackeray)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.