23 नोव्हेंबर 2019 ला नेमकं कुणासोबत होतं? संपूर्ण सत्तानाट्याचा टीव्ही9 मराठीचा खास रिपोर्ट
23 नोव्हेंबर 2019 ला नेमकं कुणासोबत कोण होतं. 22 आणि 23 नोव्हेंबरला घडलेल्या राजकीय घडामोडींची टायमिंग नेमकी काय सांगते. पाहूयात हा रिपोर्ट.
मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानं पुन्हा खळबळ माजलीय. 23 नोव्हेंबर 2019 ला नेमकं कुणासोबत कोण होतं. 22 आणि 23 नोव्हेंबरला घडलेल्या राजकीय घडामोडींची टायमिंग नेमकी काय सांगते. पाहूयात हा रिपोर्ट.
तारीख 22 नोव्हेंबर 2019 ठिकाण मुंबईतलं नेहरु सेंटर वेळ साधारण संध्याकाळी 6 ते रात्री ८ दरम्यानची, नेहरु सेंटरमधल्या बैठकीत भाजपला दूर ठेवत मविआत सत्तेच्या वाटाघाटी सुरु झाल्या. बैठकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवारांसह इतर नेते होते. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाणांसह इतर नेतेमंडळी शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंसह त्यांचे प्रमुख आमदारही होते.
या बैठकीत मविआ सरकार बनवण्यावर एकमत झालं. पुढच्या एक-दोन दिवसात मविआ राज्यपालांकडे बहुतमाचा दावा करणार होती. याच वेळेला मतदारांचा अवमान म्हणून राज्यपालांनी सरकारला मान्यता देऊ नये., म्हणून सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही झाली. किरीट सोमय्या अचानक राज्यपालांच्या भेटीला पोहोचले.
हा सारा तपशील रेकॉर्डवरचा आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टीपलेला आहे.. मात्र बैठकीत पडद्यामागे काय घडलं, त्यावर खूप आधी संजय राऊतांनी त्यांच्या सदरात लिहिलंय. राऊतांच्या मते नेहरु सेंटरमधल्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंच्या एका वक्तव्यानं ठिणगी पडली. विधानसभेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाऊ नये, यावर खरगेंचा भर होता. त्यावरुन शरद पवार-खरगेंमद्ये शाब्दिक चकमक झाली. शरद पवार संतापले. टेबलावरचे कागद गोळा करुन निघाले आणि बाहेर येताच मविआचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असण्याची घोषणा पवारांनी केली पण पवारांच्या या घोषणेवरुन काँग्रेसनं मौन बाळगलं.
22 नोव्हेंबरला मुख्यमंत्री आमचाच होईल यावर शिवसेना-भाजप ठाम होती. शिवसेनेनं सर्व आमदारांना मुंबईत पाचारण केलं. काही दिवसांपूर्वी गुवाहाटीच्या रेडिसन ब्लुमध्ये थांबलेले. अब्दुल सत्तार तेव्हा ललित हॉटेलमध्ये थांबले होते. शिवसेनेच्या काही आमदारांनी ठाकरे मुख्यमंत्री होण्याची इच्छा वर्तवली आणि काँग्रेस सत्तेच्या वाटाघाटीबद्दल अजूनही काही मुद्दे बाकी असल्याचं म्हणत होती.
राऊतांच्या दाव्यानुसार पवार-खरगेंमध्या वादामुळे बैठकीचा नूर पालटला होता. अजित पवार बराच वेळ मोबाईल फोनवर खाली मान घालून चॅटिंग करत होते. यानंतर अजित पवारही बाहेर पडले. यानंतरच्या दुसऱ्या दिवसाची सकाळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळाला हादरा घेऊन आली. तारीख 23 नोव्हेंबर 2019 वेळ सकाळी 6 ते 7 दरम्यानची ठिकाण महाराष्ट्राच्या राज्यपालांचं निवासस्थान राजभवन.
रात्री मविआच्या जन्मावर शिक्कामोर्तब झालं. पवारांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नावही डिक्लेर केलं पण त्याच्या 12 तासानंतरच अजित पवारांनी फडणवीसांसोबत सरकार बनवून सर्वात मोठा धक्का दिला. त्यावेळी साऱ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला होता. तो म्हणजे अजित पवार स्वतः गेले, की मग त्यांना पाठवलं गेलं? अजित पवारांनी शरद पवारांविरोधात बंडाचं निशाण फडकवलं, की मग अजित पवारांच्या या 72 तासांच्या बंडाची स्क्रिप्ट स्वतः शरद पवारांनीच लिहिली?
अजित पवार-फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीनं मविआचं भविष्य अंधारमय झालं. जन्माआधीच मविआची शकली होण्याची दाट चिन्ह होती पण या बंडात शरद पवारांचा हात नसल्याचं पहिलं विधान संजय राऊतांनी केलं. तारीख 26 नोव्हेंबर 2019 वेळ- पहाटेच्या शपविधीनंतरच्या दोन तासानंतर म्हणजे सकाळच्या पावणे 8 च्या दरम्यान ठिकाणी संजय राऊतांचं भांडूपमधलं निवासस्थान.
अजित पवारांविरोधात शिवसेनेनं शरद पवारांना पाठिंबा दिला. काँग्रेसनं मौन बाळगलं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नैराश्यात होते आणि इकडे राजभवनाबाहेर भाजपचा जल्लोष सुरु होता पण अजित पवारांच्या बंडामागे कोण हा प्रश्न अनुत्तरित होता. कारण पवार कुटुंबियाकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया नव्हती. अखेर 23 नोव्हेंबर 2019 च्या दुपारी 12 च्या दरम्यान सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅपला स्टेटस टाकलं .त्यावरुन अजित पवारांनीच राष्ट्रवादीविरोधात बंड पुकारल्याचा दावा झाला.
ते स्टेटस होतं ”पार्टी अँड फॅमिली स्प्लिट” म्हणजे पवार कुटुंब आणि पार्टीत दुफळी माजलीय. सुप्रिया सुळेंच्या या स्टेटसनंतर राष्ट्रवादीत मोठे पवार आणि अजित पवार समर्थक गट पडले. 24 नोव्हेंबरच्याच दुपारी सुप्रिया सुळेंनी ”काहीही कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे” असं अजित पवारांना आवाहन केलं., शरद पवारांना मानणाऱ्या वर्गानं अजित पवारांविरोधात घोषणा देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.. (( व्हिज )) यानंतर अजित पवारांनी ट्विटवर ट्विट करणं सुरु केलं. 2019 चा निकाल लागल्यानंतरच्या अनेक दिवसात अजित पवारांनी एकूण 55 ट्विट केले होते मात्र पहाटेच्या शपथविधीच्या दिवशी 21 मिनिटात अजित पवारांनी तब्बल 21 ट्विट केले.
मी राष्ट्रवादीत आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार…आमचं राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार पाच वर्ष स्थिर राहणार. अजित पवारांच्या या ट्विटनं अजून संभ्रम वाढवला… राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार की मग राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांची चर्चा सुरु असतानाच शरद पवारांनी पहिल्यांदा यावर ट्विट करत अजित पवारांना उत्तर दिलं. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या सरकारचा प्रश्नच येत नाही अजित पवारांचे ट्विट हे खोटे आणि संभ्रम पसरवणारे आहेत
मात्र नेमकं घडतंय काय., कोण कुणाच्या सोबत आहे, आणि कोण कुणाच्या विरोधात., यावरुन संभ्रम कायम होता. एकीकडे 23 नोव्हेंबरच्या दिवशी फडणवीस राष्ट्रवादीचे अजित पवार आपल्यासोबत आल्याचा दावा उल्लेख करत होते. दुसरीकडे राष्ट्रवादी म्हणजे नेमकं कोण, यावरुन गोंधळ होता., त्याचदरम्यान पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवार पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन पत्रकार परिषदेला पोहोचले.
तारीख 23 नोव्हेंबर 2019 वेळ दुपारी 12 च्या दरम्यान ठिकाण- मुंबईतलं वायबी चव्हाण सेंटर या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या बंडाशी आपला संबंध नसल्याचा दावा शरद पवारांनी केला. जे आमदार अजित पवारांना सोडून पुन्हा माघारी परतले होते., त्यांना त्यांची आपबिती सांगायला लावली..
अजित पवारांवर कारवाई करण्याचंही शरद पवारांनी म्हटलं., मात्र पुढे ती झाली नाही. 23 नोव्हेंबरची दुपारी होईपर्यंत विधीमंडळाचं गटनेतेपद अजित पवारांकडेच होतं पण पहाटेच्या शपथेच्या साधारण 7 तासांनंतर ते पद अजित पवारांकडून काढून घेण्यात आलं., जयंत पाटील नवे गटनेते बनले. या कारवाईमुळे अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप जारी करण्याचा अधिकार उरला नाही.. त्याउलट जयंत पाटील जो व्हीप जारी करतील तोच अजित पवारांना मान्य करावा लागणार होता.
आता प्रश्न उरतो तो म्हणजे अजित पवारांसोबत कोणते आमदार गेले होते.. प्रियम गांधींच्या ट्रेडिंग पॉवर पुस्तकानुसार अजित पवारांसोबत धनंजय मुंडे, मावळचे सुनिल शेळके, पिंपरीचे अण्णा बनसोडे, राजेंद्र शिंगणे, सुनिल भुसारा, बीडचे संदीप क्षीरसागर, संजय बनसोडे, प्रकाश सोळंखे, कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील, नरहळी झिरवाळ, दौलत दरोडा, नितीन पवार, माणिकराव कोकाटे आणि अमळनेरचे अनिल पाटलांसह इतर काही आमदार होते.
अमळनेरचे राष्ट्रवादी आमदार अनिल पाटलांचा चेहरा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांसारखा दिसतो. म्हणून अजित पवारांच्या बंडात जयंत पाटील सुद्धा होते की काय अशी शंका घेत मुख्यमंत्री शिंदेंनी काही दिवसांपूर्वी टोला मारला होता. लेखिका प्रियम गांधींच्या पुस्तकातील दाव्यानुसार 2019 मध्ये आधी राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. मात्र शिवसेनेनं पवारांना अधिकार दिल्यामुळे त्यांचं मन बदललं., पण अजित पवार शिवसेनेसोबत जाण्यासू उत्सुक नव्हते.
मोठ्या पवारांचं मन बदलल्यामुळेच अजित पवारांनी बंड केल्याचा दावा त्या पुस्तकात आहे. लेखिकेनं अजित पवार- फडणवीसांमध्ये काय संवाद झाला. त्याचाही दाखला दिलाय. मात्र पवार म्हणतात की जर मी पहाटेच्या शपथविधीमागे असतो, तर सरकार ७२ तासात पडलंच नसतं.
राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी म्हणतात की राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी अजित पवारांनी ते नाट्य केलं. आता फडणवीसांनी दावा केला की पहाटेचा शपथविधीला खुद्द शरद पवारांचाच पाठिंबा होता.
पहाटेच्या शपथविधीवरुन प्रत्येक नेत्याकडे नवं व्हर्जन आणि एक नवी कहाणी आहे. जे संजय राऊत 23 नोव्हेंबर 2019 ला अजित पवारांनी शरद पवारांना धोका दिल्याचं म्हटले. ज्या संजय राऊतांचा चेहरा त्यादिवशी रागावलेला होता., तेच संजय राऊत 30 डिसेंबर 2021 ला अजित पवारांच्या शपथविधीत एक पारदर्शकता होती., असं हसतमुखानं म्हणाले.
ज्या भाजपनं शपथविधीमागे शरद पवारांच्या पाठिंब्याचा दावा केलाय. त्यांचेच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांमध्ये आमदार जमवण्याची ताकद नव्हती., असंही विधान केलंय. त्या पहाटेच्या सत्तानाट्याचा कर्ता कर्विता कोण होता, यावर संजय राऊत म्हणतात की जर अजित पवारांनी आत्मचरित्र लिहिलं तर त्यातत्या रहस्यावरचा पडदा उठेल.
पहाटेच्या सत्तानाट्याचं खरं सत्य काय, यावर फडणवीस याआधी म्हटलेत की ते सुद्धा यावर एक पुस्तक लिहितील पण अजित पवार मात्र यावर कायम मौन आहेत. कधी वेळ आल्यावर बोलेन किंवा मग नो कॉमेंट इतकंच उत्तर अजित पवारांकडून मिळतं.