मोठा अनर्थ टळला! मुंबईतून टेक ऑफसाठी निघालेल्या बोईंग 737 विमानाच्या काचेला तडे, उड्डाण थांबवलं
विमानाच्या विंडशील्डला तडे गेले असल्याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला देण्यात आली होती.
मुंबई : स्पाईस जेटचं (SpiceJet) टेक ऑफ करण्यासाठी निघालेलं विमान पुन्हा एकदा मुंबई विमानतळावर आणण्याची नामुष्की ओढावली. शनिवारी ही घटना घडली. विमानाच्या पायलट (Aeroplane Pilot) समोराच्या काचेला अचानक तडे गेल्यामुळे हा निर्णय घेतण्यात आला. सुरक्षितरीत्या विमानाचं सुखरुप लॅन्डिंग करण्यात आलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. स्पाईस जेटचं बोईंग 737 हे विमान मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी उड्डाण घेणार होतं. पण अर्ध्या वाटेतून विमानाला पुन्हा माघारी परतावं लागलं. विमानाच्या विंडशील्डच्या बाहेरील बाजूच्या काचेला तडे (Broken Glass) गेल्याचं आढळून आल्यामुळे वैमानिकांनी उड्डाण करणं धोकादायक असल्याचं कळवल्यामुळे विमान पुन्हा माघारी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्याचं ठरवलं.
मोठा अनर्थ थोडक्यात टळला
विमानाच्या विंडशील्डला तडे गेले असल्याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला देण्यात आली होती. त्यानंतर सर्वांनी मिळून विमान अशा परिस्थितीत हवेत झेपावणं धोक्याचं ठरु शकतं, हे मान्य करुन विमानांचं उड्डाण थांबवलं. त्यानंतर या विमानातील प्रवाशांना सुखरुप खाली उतरवण्यात आलं. विमानाचे पायलट आणि एटीसीनं प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.
चीनमध्ये झालेल्या बोईंग 737 विमानाचा थरारक व्हिडीओ
बोईंग 737 मॅक्स जेटवर बंदी
खरंतर बोईंग 737 हे विमान नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलं आहे. एप्रिलमध्ये डीदीसीएनं बोईंग 737 मॅक्स जेटवर बंदी घातली होती. तर काही विमानांना अटीशर्थींसह परवानगी दिली होती. भारतात व्यावसायिक वापरासाठी बोईंग 737 विमानाचा वापर करण्यावार निर्बंध घालण्यात आले आहेत. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून याबाबतचे निर्देश देण्यात आले होते.
पाहा फोटो :
SpiceJet Boeing 737 aircraft was scheduled to operate SG-385 (Mumbai-Gorakhpur). During cruise, the windshield outer pane was observed to be cracked. PIC decided to return back to Mumbai. ATC was apprised and the aircraft landed safely at Mumbai airport: SpiceJet Spokesperson pic.twitter.com/rc815eAa9K
— ANI (@ANI) May 28, 2022
एएनआयनं या विमानाचा फोटो शेअर करत नेमकी किती विंडशील्डची किती हानी झाली होती, याची माहिती दिली आहे.