भाजपची नवीन कार्यकारिणी लवकरच होणार जाहीर; श्रीकांत भारतीयांवरही मोठी जबाबदारी?; नागपूरच्या बैठकीत होणार निर्णय

प्रदेश संघटन सरचिटणीस हे भाजपमध्ये अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. या पदावर सध्या आमदार श्रीकांत भारतीय आहेत. त्यांनाच या पदावर कायम ठेवायचे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आलेली प्रचारक व्यक्ती परंपरेनुसार या पदावर नेमायची याबाबतचा निर्णयही नागपूरच्या बैठकीत होणार आहे.

भाजपची नवीन कार्यकारिणी लवकरच होणार जाहीर; श्रीकांत भारतीयांवरही मोठी जबाबदारी?; नागपूरच्या बैठकीत होणार निर्णय
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 8:01 AM

मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपकडून आता संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली चालू झाल्या आहे. नुकताच शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government)मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, त्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule as BJP state president) यांचीही नुकताच निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता भाजपकडून नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवीन प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता भाजपकडून प्रदेश कार्यकारिणीच्या हालचाली वाढल्या आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप कार्यकारिणीचीही निवड होण्याची शक्यता आहे.

नागपुरच्या बैठकीत होणार चर्चा

कार्यकारिणीतील नावे निश्चित करण्याबाबतही नागपूरच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजपच्या नव्या कार्यकारिणीमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे भाजप कार्यकर्त्यांची नजरा लागून राहिल्या आहेत.

भाजपमधील कोणाला मिळणार संधी

भारतीय जनता पक्षाकडून नेहमी संघटनाबांधणीवर जोरदार पणे काम केले जाते. आता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपच्या कार्यकारिणीची निवड होण्याची शक्यता आहे. या कार्यकारिणीचा निर्णय नागपूरमधूनही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपमधील कोणत्या नेत्याला संधी मिळणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सरचिटणीस पदावर श्रीकांत भारतीय?

प्रदेश संघटन सरचिटणीस हे भाजपमध्ये अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. या पदावर सध्या आमदार श्रीकांत भारतीय आहेत. त्यांनाच या पदावर कायम ठेवायचे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आलेली प्रचारक व्यक्ती परंपरेनुसार या पदावर नेमायची याबाबतचा निर्णयही नागपूरच्या बैठकीत होणार आहे.

विधान परिषदेवरच्या नियुक्त्याही लवकरच

राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्तीही लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला 8, तर शिंदे गटाला 4 जागा दिल्या जातील असंही सूत्रांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.