पगार न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, एसटी संघटनेकडून आंदोलनाची हाक

पगार वेळेवर होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या एका एसटी (राज्य परिवहन मंडळ) चालकाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री इथे घडली आहे.

पगार न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, एसटी संघटनेकडून आंदोलनाची हाक
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 8:58 PM

मुंबई : पगार वेळेवर होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या एका एसटी (राज्य परिवहन मंडळ) चालकाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री इथे घडली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जुलै महिन्याचे वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी सोमवारी 30 ऑगस्ट रोजी आगाराबाहेर आंदोलन करणार आहेत. संघर्ष एसटी कामगार युनियन या संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. (ST Driver commits suicide due to not getting salary, ST employee organization will protest)

संघर्ष एसटी कामगार युनियनच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये कामगारांना वेतन वेळेत मिळावे म्हणून औद्योगिक न्यायलयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने 14 ऑगस्ट 2021 रोजी कामगारांच्या बाजूने निवाडा देत वेतन तातडीने दिले जावे, असे आदेश काढले. तरीही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करत एसटी महामंडळाने कामगारांना वेतन वेळेत दिले नाही. त्याच्या परिणामी गरिबी व दारिद्र्याला कंटाळून चालक कमलेश बेडसे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष जगनारायण कहार यांनी केला आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही महिन्यांपासून वेतन वेळेवर न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

सोमवारी, एसटी महामंडळाच्या उदासीनतेच्या विरोधात राज्यभरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगाराबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. ही निदर्शने ड्युटीची वेळ संपल्यानंतर होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. झेंडे बावटे बाजूला ठेवून एक उपेक्षित कर्मचारी म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी यात सामील होण्याचे आवाहन संघर्ष एस टी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केले आहे.

इतर बातम्या

काल लालूंना भेटले, आज शरद यादवांना; भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी देशव्यापी लढा उभारणार?

ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंड वांझोटे; विजय वडेट्टीवार संतापले

मोठी बातमी: ठाकरे सरकार मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?

(ST Driver commits suicide due to not getting salary, ST employee organization will protest)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.