एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिवस, विलिनीकरणाचा अहवाल कोर्टात सादर केला जाण्याची शक्यता

संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही एसटीचे विलीनीकरण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संप ताणून संपूर्ण 12 आठवडे एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले नाहीत.

एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिवस, विलिनीकरणाचा अहवाल कोर्टात सादर केला जाण्याची शक्यता
एसटी संप, अनिल परब
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 7:37 AM

मुंबई: एसटी महामंडळाचे (ST Merger) राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers Strike) गेल्या तीन महिन्यापासून संप पुकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) यासंदर्भात उच्च स्तरीय त्री सदस्यीय समितीची स्थापना करून विलीनीकरणावर अभ्यास करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयानं 12 आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्फत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 3 फेब्रुवारी रोजी 12 आठवड्याची मुदत संपत आहे. राज्य सरकारकडून आज एसटी विलिनीकरणावरील अहवाल न्यायालयापुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्य सचिव यांच्या  अध्यक्षतेखाली अर्थ खात्याचे सचिव आणि परिवहन खात्याचे सचिव यांच्या समितीकडून तयार करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी च्या 28 कामगार संघटनांकडून विलीनीकरणाबाबत व्यक्तिगत अभिप्राय मागविला होता. तर, अन्य काही राज्यातील एसटीच्या विलीकरणाचा निर्णय कोणत्या धोरणात घेण्यात आला आहे. याचा तपशीलवार अभ्यास केला असल्याची माहिती मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या अभिप्रायानंतर एसटी विलिनीकरणासंदर्भातील अहवाल तयार करण्यात आला असून 12 आठवड्याची मुदत संपल्यानंतर तो सादर केला जाईल असं सांगितलं.

एसटी कर्मचारी 12 आठवडे संपावर

संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही एसटीचे विलीनीकरण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संप ताणून संपूर्ण 12 आठवडे एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले नाहीत. राज्यभरात सुरू असलेल्या संपामुळे एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई सुरुच ठेवली आहे.

बुधवारी एकाच दिवशी 189 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 7252 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 11 हजार 24 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आता निलंबना ऐवजी कर्मचाऱ्यांवर सरळ दोषारोपपत्र दाखल केले जात आहे. तर 8273 एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहे. मात्र आता न्यायालयात सादर होणाऱ्या तीन सदस्यीय समितीच्या अहवाला नंतर न्यायालय विलीकरणाच्या मुद्यावर काय निर्णय देते याकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवशाही सुरु, लालपरी बहुसंख्येने डेपोतचं

वाहतूक सेवेतील सर्वाधिक लांबलेल्या एसटी संपाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. अद्यापही एसटी पूर्ण क्षमतेनं सुरू नाही. विलिनिकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. शिवशाही सुरू असून लालपरी अजून पूर्ण क्षमेतने सुरु झालेली नाही. आत्तापर्यंत 27 हजार संपकरी कर्मचारी कामावर परतले, तर 7 हजार कर्मचारी बडतर्फ झालेत तर 11 हजार करामचारी निलंबित झालेत. या कर्मचाऱ्यांसह खासगी चालकांच्या मदतीने राज्यभरात एकूण 8 हजारांहून अधिक फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्यायत.तसेच 250 पैकी 240 आगार चालू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मात्र आजही विलनीकरणावर कर्मचारी ठाम आहेत.

इतर बातम्या:

Satara Accident | साताऱ्यात भीषण अपघात, कारची दुभाजकाला धडक, 6 जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक

Nashik | महापालिका निवडणूक बारगळणार का, पुन्हा कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष, कारण काय?

ST Workers Strike hearing at Bombay High Court Maharashtra Uddhav Thackeray Government submit Report on MSRTC Merger

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.