AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS कार्यकर्ता अरविंद वैश्य यांच्या अंत्ययात्रेवर दगडफेक, धारावीत तणावाचं वातावरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही जणांचे भांडण थांबवण्यासाठी गेलेल्या अरविंद वैश्य यांची काही लोकांनी मिळून हत्या केल्याचा आरोप आहे. अरविंद पोलीस स्टेशनवरुन तक्रार दाखल करुन घटनास्थळी येत असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. पोलीस पोहोचण्याआधीच त्याच्यावर सपासप वार करण्यात आले होते.

RSS कार्यकर्ता अरविंद वैश्य यांच्या अंत्ययात्रेवर दगडफेक, धारावीत तणावाचं वातावरण
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 10:45 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता अरविंद वैश्य (२६) यांच्या अंत्ययात्रेवर अचानक दगडफेक झाल्याने धारावीत तणाव निर्माण झालाय. दगडफेक थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले चार जण जखमी झालेत. धारावीत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. धारावीत तणावपूर्ण शांतता आहे. अरविंद वैश यांच्यावर धारावी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीला दहा हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते.

मध्यस्थी करण्यासाठी गेला होता अरविंद

राष्ट्रीय स्वयंसेवक अरविंद वैश्य हे धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये राहत होते. ते एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी त्यांच्या मित्राचा एका व्यक्तीशी वाद झाला. त्यामुळे ते दोघे धारावी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी गेला. पोलीस ठाण्यातून परतत असताना आरोपींनी अरविंद वैश्य यांच्यावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर अरविंदला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. सोमवारी या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली.

आज अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेत दहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. धारावीच्या टी जंक्शनवर अंत्ययात्रा पोहोचताच आधीच तयारीत असलेल्या लोकांनी अंत्ययात्रेवर दगडफेक सुरू केली, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भाजप नेत्याकडून कठोर शिक्षेची मागणी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, धारावीतील ही दगडफेक ड्रग माफियांनी केली होती. “मी स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवावी आणि संबंधित लोकांवर कडक कारवाई करावी.

अरविंदचा भाऊ शैलेंद्र कुमार वैश्य यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही आमदार राम कदम यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

धारावीच्या राजीव नगर भागात रविवारी रात्री भांडण सोडवायला गेलेल्या अरविंद वैश्य याची हत्या केली गेली. अरविंद वैश्यचा भाऊ शैलेंद्र वैश्यच्या तक्रारीनुसार ही घटना रविवारी संध्याकाळी 7 वाजता घडली. अल्लू, आरिफ, शुभम आणि शेर अली यांचं सिद्धेश नावाच्या व्यक्तीसोबत भांडण सुरू होतं. भांडण सुरू असताना अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना मारहाण सुरु करायला सुरुवात केल. त्यानंतर हे भांडण सोडवण्यासाठी अरविंद तिकडे पोहोचला. आरोपींनी अरविंदला ही मारहाण केली.

मारहाणीची तक्रार द्यायला अरविंद मित्राच्या बाईकवरुन धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. मागून सद्दाम आणि जुम्मनही तेथे पोहोचले. अरविंदला ते पोलिसांसमोरच केस मागे घ्यायची धमकी देत होते. अशी माहिती अरविंंदच्या भावाने दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन शिपायांसोबत अरविंदला घटनास्थळी पाठवलं. अरविंद आणि राजीव वसीम गॅरेजच्या पुढे आले तेव्हा अल्लू, आरिफ, सद्दाम, जुम्मन, शेर अली आणि शुभम यांनी दोघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. पोलिसांनी अल्लूला पकडलं मात्र इतर आरोपी पळून गेले. आरिफलाही पोलिसांनी पकडलं. अरविंद वैश्यला गंभीर जखमी अवस्थेत सायनच्या रुग्णालयात नेलं पण त्याचा मृत्यू झाला होता.

अरविंद वैश्यच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांच्या समोर अशी निघृणपणे हत्या कशी होऊ शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित कारवी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीये.

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.