राज्यातील उद्योग चक्र फिरले, 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू : सुभाष देसाई

एप्रिल महिन्यापासून 55 हाजर 245 उद्योगांनी उत्पादन सुरु केलं आहे. तर 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत

राज्यातील उद्योग चक्र फिरले, 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू : सुभाष देसाई
Follow us
| Updated on: Jun 05, 2020 | 4:16 PM

मुंबई : कोरानामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात (Subhash Desai On Mission Began Again) करण्यासाठी उद्योग विभाग सज्ज झालं आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ‘मिशन बिगेन अगेन’च्या मिशनमध्ये उद्योग विभागही सज्ज झालं आहे. एप्रिल महिन्यापासून 55 हाजर 245 उद्योगांनी उत्पादन सुरु केलं आहे. तर 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, असं सुभाष देसाई (Subhash Desai On Mission Began Again) यांनी सांगितलं.

मुंबई आणि जवळपासच्या महापालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव इथे अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना सरकारने परवानगी दिली आहे. निर्यात करणार्‍या उद्योगांनाही परवानगी दिली आहे. शेती आधारित उद्योगांनाही परवानगी दिली आहे. संरक्षण दलाला लागणार्‍या उत्पादनांच्या उद्योगांना परवानगी दिली, असंही सुभाष देसाई म्हणाले.

तसेच, उद्योग चक्र वेगाने फिरु लागले आहेत. उद्योग विभाग आणि एमआयडीसी उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील आहे. देशातील विदेशी गुंतवणुकींपैकी 33 टक्के गुंतवणूक राज्यात येते. या गुंतवणुकदारांसाठी आणखी चांगले वातावरण तयार करण्याचं काम सुरु आहे.

रायगडमध्ये दिघी येथे 15 हजार एकरावर नवी एमआयडीसी उभी राहत आहे. माणगाव एमआयडीसी असं या एमआयडीसीचं नाव असेल. कारण ती माणगाव तालुक्यात आहे (Subhash Desai On Mission Began Again). देशी आणि विदेशी 10 गुंतवणूकदारांशी आमची बोलणी सुरु आहे, त्यांना इथे उद्योग सुरु करण्यासाठी जागा दिली जाईल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

माणगावपासून मुंबई जवळ आहे, नवी मुंबई विमानतळ जवळ आहे, जेएनपीटी बंदर जवळ आहे. 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक इथे होऊ शकते. माणगाव एमआयडीसीत हजारो नोकर्‍या उपलब्ध होतील. यात इंजिनिअरिंग, औषध उत्पादक, इलेक्ट्रॉनिक असे विविध उद्योग इथे उभे राहतील.

मजूर आपापल्या राज्यात परतले आहेत, स्थानिकांना नोकर्‍या मिळाव्या म्हणून आम्ही एक पोर्टल सुरु करणार आहोत. ‘महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट ब्यूरो’, असं या पोर्टलचं नाव असेल. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांना उद्योगांना लागणारे मनुष्यबळ पुरवले जाईल. जिथे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी या महिन्यातच आणखी काही उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असं ही सुभाष देसाई यांनी (Subhash Desai On Mission Began Again) सांगितलं.

संबंधित बातम्या :

रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.