Eknath Shinde: ‘अशा धमक्या अनेकवेळा’, सुरक्षतेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमका देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यातच दसरा मेळावा तोंडावर आला आहे. असे असतानाच या धमकीबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे.

Eknath Shinde: 'अशा धमक्या अनेकवेळा', सुरक्षतेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 4:48 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे ही धमकी (Threat) देण्यात आली असून यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यापूर्वीही अशा धमक्या आल्या आहेत. त्यामुळे त्याला मी भीक घालत नाही. धमक्यांमुळे मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणी रोखूही शकणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याच बरोबर गृहविभागाचे (Home Department) अधिकारी हे योग्य ती सुरक्षतेची काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही अशा धमक्या आल्या होत्या. नक्षलवादी यांच्याकडूनही अशी धमकी आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गडचिरोलीचे पालकमंत्री असताना असा प्रसंग ओढावला होता. त्यामुळे हे काही माझ्यासाठी नवीन नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

मला जनतेमध्ये राहण्यास आवडते.अशा धमक्यांमुळे माझ्या वागण्यात कोणताही बदल होणार नाही. शिवाय जनतेमध्ये जाण्यास मला कोणीही रोखू शकणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अशा बाबींचा परिणाम यापूर्वीही झालेला नाही आणि भविष्यातही होणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमकी पत्रानंतर गृहविभागाने सुरक्षतेची योग्य ती काळजी घेण्यास सुरवात केली आहे. त्याअनुषंगाने गृहविभागाला सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी ही पत्राद्वारे देण्यात आली होती. आतापर्यंत तब्बल तीन वेळेस त्यांना अशाप्रकारची धमकी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही असा प्रसंग घडला होता.

सुरक्षतेच्या दृष्टीने गृहविभाग हे सक्षम आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे समोरच्याने अशा धमक्याही देऊ नयेत असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.