Sudhir Mungantiwar: डॉक्टरपेक्षा कंपाउंडर मोठा; राज्यातील राजकीय परिस्थिती; सुधीर मुनगुंटीवारांचा मविआवर हल्लाबोल
सध्याच्या राज्यातील राजकारणावर बोलताना त्यांनी सांगितले की सध्याची येथील परिस्थिती म्हणजे डॉक्टर पेक्षा कंपाउंडर मोठा अशा सगळ्या गोष्टी सुरू असल्याचे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. भाजप जिंकली पण विजयी झाली नाही असंही ते म्हणाले होते कधी कोणाला काय म्हणायचं हे त्यांचं त्यांनाच माहीत असा उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केली.
मुंबईः राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे, बंडखोर आमदारांमुळे (Rebel MLA) महाविकास आघाडीसह (Mahavikas Agahdi) विरोधी पक्षही आता सरकारच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून त्यांच्या भूमिकांवर बोटही ठेवत आहेत. शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा बाप काढल्याबद्दल भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (BJP MLA Sudhie Mungantiwar) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते कोणाचा बाप काढतील याबद्दल आपण भाष्य करण्याची आवश्यकता नाही.
त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, त्यांची भाष्य माहित आहे आपल्याला पाप केल्याने कोरोना होतो, आता उद्धव ठाकरे ना कोरोना झाला याला काय म्हणायचं ? असा सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
डॉक्टरपेक्षा कंपाउंडर मोठा
सध्याच्या राज्यातील राजकारणावर बोलताना त्यांनी सांगितले की सध्याची येथील परिस्थिती म्हणजे डॉक्टर पेक्षा कंपाउंडर मोठा अशा सगळ्या गोष्टी सुरू असल्याचे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. भाजप जिंकली पण विजयी झाली नाही असंही ते म्हणाले होते कधी कोणाला काय म्हणायचं हे त्यांचं त्यांनाच माहीत असा उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केली.
दानवांचा संहार करण्यासाठी भगवान विष्णू
दानवांचा संहार करण्यासाठी भगवान विष्णू होते हा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, भगवान विष्णूंनीसुद्धा वराह अवतार घेतला होता, आणि ज्या प्रमाणे भगवान विष्णूनी पृथ्वीचे संरक्षण केले होते, त्याप्रमाणेच बंडखोर आमदारसुद्धा राज्याचा संरक्षण करतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.
आता काश्मीर पंडित आठवले
महाविकास आघाडीवर टीका करताना आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा समाचार घेताना सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचे सुरक्षा गेल्यानंतर काश्मीर पंडित यांच्या सुरक्षेचा प्रश्न आठवतो त्याला काय म्हणणार अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
स्थिर सरकार यावं हीच आमचीपण इच्छा
सध्या राज्यातील सरकार अस्थिर असण्यावरून सवाल उपस्थित करण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितले की, काही प्रश्न भगवान विठ्ठलाचा चरणी सोडून द्यायचे असतात वाट पहायची असते स्थिर सरकार यावं ही आमचीपण इच्छा आहे असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तोडफोड झाल्याने केंद्राची सुरक्षा
महाविकास आघाडीतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांकडून हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांना सुरक्षा देण्याबद्दल काय सांगाल असं ज्यावेळी विचारण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्याबद्दल काही माहिती नाही, मात्र तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवता की त्यांच्या कार्यालयाचे नुकसान होत आहे तोडफोड होत आहे त्यामुळे सुरक्षा दिली जात असल्याचे सांगितले. राज्यातील बंडखोर आमदारांच्या घर आणि कार्यालयांना आता केंद्राकडून सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.