सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया काय?

आमच्या रेकार्डनुसार कुठही गट-तट नाहीत. त्यामुळे विधिमंडळात शिवसेना हा एकच गट आहे. कुणाला वाटतं असेल की, आमचा गट वेगळा आहे.

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया काय?
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 4:48 PM

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू आहे. आज सुनावणीचा पहिला दिवस होता. आणखी दोन दिवस सुनावणी सुरू राहणार आहे. या सत्तासंघर्षाबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदारांना निलंबन करण्याचा निर्णय आणि कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. आज सुप्रीम कोर्टाने देखील तसेच मत नोंदवलं आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड नियमानुसार झाली आहे. मतदान घेऊन निवड झाली आहे. मतदान घेताना जे आमदार पात्र असतात त्यांना मतदानाचा अधिकार असतो. आमदार अपात्र झाले असते किंवा नसते. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड होत नसते. जे आमदार उपस्थित होते आणि कार्यरत होते त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यामुळे कोणतंही वेगळं मत कोर्ट मांडू शकत नाही, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

जेवढे वाटते तेवढे सोप नाही

पक्ष नेतृत्व नेत्याची निवड करते, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल यांनी केला. सोनिया गांधी, मल्लीकार्जून खर्गे यांची नेता म्हणून निवड केली होती, असंही सिब्बल यांनी म्हंटलं. यावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, मी कपिल सिब्बल यांच्या मताशी सहमत नाही. कपिल सिब्बल यांना जेवढं वाटत आज तेवढं सोपं नाही. आणि ते शक्य नाही. अपात्रतेच्या बाबतीत अनेक याचिका दाखल होतात, असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

तो अधिकार विधानसभा अध्यक्षांना

आमदारांना अपात्र ठरवाण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. अध्यक्ष अनुपस्थित असताना ते अधिकार उपाध्यक्ष ना जातात. मात्र अध्यक्ष उपस्थित असताना ते अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार उपाध्यक्षांना नाही, असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

तर तसं पत्र त्यांनी द्यावं

विधानभवनातील शिवसेनेचे कार्यालय एकच आहे. त्यात कोणतेही गट नाहीत. अजून कुणी वेगळ्या कार्यालयाची मागणी ही केलेली नाही. त्यामुळं कुणी मागणी केल्यास त्यावर योग्य तो निर्णय घेता येईल. त्यासाठी वेळ लागेल, असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

राहुल नार्वेकर म्हणाले, आमच्या रेकार्डनुसार कुठही गट-तट नाहीत. त्यामुळे विधिमंडळात शिवसेना हा एकच गट आहे. कुणाला वाटतं असेल की, आमचा गट वेगळा आहे. तर त्यांनी तसं पत्र आमच्याकडं द्यावं. त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल.

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.