डॉ. पायल तडवी आत्महत्या : आरोपी महिला डॉक्टरांना पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टरांना पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या : आरोपी महिला डॉक्टरांना पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 8:31 PM

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टरांना पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. यामुळे आरोपी डॉक्टर मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करु शकणार आहेत. (Supreme Court permits accused doctors in Dr. Payal Tadavi suicide case  to resume post graduation studies)

मुंबई उच्च न्यायलयानं 3 आरोपी महिला डॉक्टरांना सशर्त जामीन देताना बीवायएल नायर हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई केली होती. याविरोधात डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या डॉक्टरांना इतर महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करण्यास परवानगी देता येईल का याबाबत मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियाकडून त्यांचे मत मागवले होते.यावर पदव्युत्तर शिक्षणासाठी नोंदणी करते वेळीच एका मार्गदर्शकाची निवड करावी लागते आणि त्याकडेच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यामुळे दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेता येणार नसल्याचे मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियानं सांगितले होते.

सर्वोच्च न्यायालयानं 3 महिला डॉक्टरांना शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी देताना साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये. ज्यावेळी न्यायालयात सुनावणी असेल तेव्हा हजर राहावे, यासह इतर अटीवंर परवानगी देण्यात आली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण

मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवीने 22 मे 2019 रोजी आत्महत्या केली. पायलने तिच्या सुसाइड नोटमध्ये वरिष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला होता. या छळाला कंटाळून पायलने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनाही महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्डनं निलंबित केलं होत.

संबंधित बातम्या :

डॉ. पायल तडवी आत्महत्या : आतापर्यंत काय काय झालं?

जातीवाचक शब्दप्रयोग करुन डॉ. पायल तडवींचा छळ, चौकशी अहवालाचा निष्कर्ष

(Supreme Court permits accused doctors in Dr. Payal Tadavi suicide case to resume post graduation studies)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.