AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल, केवळ रस्ताच बांधण्याची अट

स्थगिती हटवताना केवळ रस्त्याचं काम करा, अन्य विकासकामे करु नका, असे निर्देश कोर्टाने दिले

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल, केवळ रस्ताच बांधण्याची अट
| Updated on: Dec 17, 2019 | 1:39 PM
Share

नवी दिल्ली :  शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबईतील कोस्टल रोडला (Supreme Courts green signal to coastal road) सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबई हायकोर्टाने कोस्टल रोडला दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली. उच्च न्यायालयाने कोस्टल रोड या मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक सर्व परवानग्या रद्द केल्या होत्या. त्याविरोधात महापालिकेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. (Supreme Courts green signal to coastal road

यावर सुप्रीम कोर्टाने मुंबईतील वाहतूक कोंडी पाहता शहरात वाहतुकीच्या नव्या पर्यायांची गरज असल्याचं म्हणत, कोस्टल रोडवरील स्थगिती हटवली. पण ही स्थगिती हटवताना केवळ रस्त्याचं काम करा, अन्य विकासकामे करु नका, असे निर्देश सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं दिले.

कोस्टल रोड प्रकल्प काय आहे?

कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. कोस्टल रोडमुळं प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे. तर 34 टक्के इंधन वाचणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचंही बोललं जातं.

हा रोड मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यान कोस्टल रोड 9.98 किमी लांबीचा असणार आहे. कोस्टल रोडवर 1650 वाहनं पार्किंगची सोय असेल. याच्या बांधकामासाठी 4 दशलक्ष मेट्रिक टनचं मटेरियल लागणार आहे. माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार आहेत. कोस्टल रोडमुळं 26 हजार कोटी रुपयांची 90 हेक्टर जमीन खुली होणार आहे. विशेष म्हणजे पुरामध्येही कोस्टल रोडचा वापर शक्य होणार आहे.

कोस्टल रोड कसा असेल, काय वैशिष्ट्य आहेत?

  • साडे सहा किलोमीटरचे बोगदे
  • आठ लेनचा मार्ग, मार्गावर ४ इंटरचेंज
  • सिग्नल फ्री मार्ग
  • 34 % इंधन बचत होणार
  • 1650 वाहन पार्किंगची सोय
  • 4 दशलक्ष मेट्रिक टनच मटेरियल वापरणार
  • माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार
  • 4 वर्षाचा कालावधी
  • 90 हेक्टर ओपन जागा, 26 हजार कोटींची जागा उपलब्ध होणार
  • पुरामध्ये देखील हा मार्ग वापरता येणार

संबंधित बातम्या  

कोस्टल रोडचं काम थांबल्यानं दररोज 10 कोटींचं नुकसान, बीएमसी सर्वोच्च न्यायालयात 

स्पेशल रिपोर्ट : उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडला हायकोर्टाचा ब्रेक ! 

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.