भाजपच्या नेत्यांमध्ये अजूनही काही रसिक राहिल्याचं ऐकून खूप समाधान वाटलं : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लेखक अंबरीश मिश्र यांच्या 'चौकात उधळले मोती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात जोरदार राजकीय टोलेबाजी केली.

भाजपच्या नेत्यांमध्ये अजूनही काही रसिक राहिल्याचं ऐकून खूप समाधान वाटलं : सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 7:52 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लेखक अंबरीश मिश्र यांच्या ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात जोरदार राजकीय टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांमध्ये अजूनही काही रसिक शिल्लक राहिल्याचं ऐकून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही कौतुक केलं (Supriya Sule comment of Literature and BJP leader Ashish Shelar).

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला आज आशिष शेलार यांना भेटून आणि त्यांचं भाषण ऐकून खूप आनंद वाटला. भाजपच्या नेत्यांमध्ये देखील अजूनही काही रसिक राहिलेत हे ऐकून मनाला खूप समाधान वाटलं. कारण मी आणि संजय राऊत दोघेही संसदेत जी भाषणं ऐकतो त्यात वेगळीच धार असते. त्यात साहित्य कला आजकाल दिसतच नाही. याआधी भाषणांमध्ये साहित्य कला याचा समावेश असायचा.”

“संजय राऊत एक चांगलं आणि दर्जेदार लिखाण करतात. संजय राऊत जे लिहितात त्याची दररोज हेडलाईनच होते. त्यांचं जरा राजकीय असतं, पण आता मला ते फार आवडतं आणि पटतंही,” असं म्हणत त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. यानंतर सभागृहातील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावेळी आशिष शेलार यांनी देखील लेखक अंबरीश मिश्र यांचं कौतुक केलं. आपल्या मतदारसंघातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहतो असंही शेलार यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

एकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, सुप्रिया सुळेंनी चेंडू ‘या’ नेत्याकडे टोलवला

…तर ही परिस्थिती उद्भवली नसती, पुण्याच्या महापौरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

सुप्रिया सुळे कुणाल कामराच्या भेटीला, ‘शट अप या कुणाल’मध्ये मुलाखत रंगणार?

Supriya Sule comment of Literature and BJP leader Ashish Shelar in Ambrish Mishra Book publication

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.