Supriya Sule | बहीण-भावाच्या नात्यातील भावनिक ओलावा, सुप्रिया ताईंना अश्रू अनावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडलीय. अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे पक्ष दोन गटात विभागला गेलाय. या घटनेकडे सुप्रिया सुळे नेमक्या कशा बघतात, त्यांना अजित पवार यांच्याबद्दल आता काय वाटतं? अशा सर्व प्रश्नांवर सुप्रिया सुळे यांनी सविस्तर भूमिका मांडलीय.

Supriya Sule | बहीण-भावाच्या नात्यातील भावनिक ओलावा, सुप्रिया ताईंना अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 6:31 PM

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतलीय. विशेष म्हणजे अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशी भूमिका आता त्यांच्या गटाच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे. अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा मोठा भूकंप घडून आलाय. या भूकंपाचे परिणाम काय होतील? ते आगामी काळात बघायला मिळेल. पण जे घडलंय त्यामुळे पवार कुटुंबात केवढी मोठी खळबळ उडालीय याची कल्पना देखील आपण करु शकणार नाही.

खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. तर अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. शरद पवार यांचा बोट धरुन अजित पवार राजकारणात आले. सुप्रिया सुळे यांचं राजकारणही शरद पवार यांच्या मार्गदर्शनापासून सुरु झालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांमध्ये, पक्षबांधणीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन्ही बहीण-भाऊंची भूमिका महत्त्वाची राहिलीय. दोघांना पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून योग्य मान देण्यात आलाय.

दोन्ही बहीण-भावांची कामाची पद्धत वेगळी असली तर सर्वसामान्यांसाठी काम करण्याची पोटतिडकी दोघांमध्ये आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या राजकारणाचा मुद्दा बाजूला ठेवूया. पवार कुटुंबियांमध्ये असणाऱ्या जिव्हाळ्याची नेहमी चर्चा होत असते. प्रत्येक सणाला सर्व पवार कुटुंब एकत्र जमतात. सर्वजण एकत्र सण साजरा करतात. त्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये आपापसात खूप जीव आहे. असं असताना अजित पवार यांनी घेतलेला राजकीय निर्णय हा पवार कुटुंबियांसाठी धक्का देणारा आहे.

…आणि सुप्रिया ताई यांना रडू कोसळलं

सुप्रिया सुळे यांनी नुकतंच ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांना अजित पवार यांच्यासोबत भाऊबीज साजरा करताना व्हिडीओ दाखवण्यात आला. अजित पवार यांच्यासोबत आपले फोटो पाहून सुप्रिया सुळे यांना रडू कोसळलं. त्या खूप भावूक झाल्या. सुप्रिया सुळे संबंधित व्हिडीओ क्लिपवर नेमकं काय म्हणाल्या ते समजू शकलं नाही. कारण ‘झी मराठी’कडून या मुलाखतीचा पाच मिनिटांचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. येत्या रविवारी ही संपूर्ण मुलाखत आपल्याला बघायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाय हे तुम्हाला मान्य आहे का?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाय हे तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया यांनी नाही असं उत्तर देत सविस्तर विश्लेषण केलं. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही. त्या पक्षाचे देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना पक्षाने नोटीस पाठवली आहे. आम्ही उत्तराची वाट पाहतोय”, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.