मुंबईचं ‘जम्बो’ प्लॅनिंग, एका दिवसात 50 हजार जणांना लस टोचण्याचं नियोजन

मुंबई महापालिकेने लसीकरणाचा जम्बो प्लॅननुसार असून एका दिवशी 50 हजार लोकांना लस देण्याचं नियोजन आहे. BMC planning corona vaccination

मुंबईचं 'जम्बो' प्लॅनिंग, एका दिवसात 50 हजार जणांना लस टोचण्याचं नियोजन
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 2:15 PM

मुंबई : केंद्र सरकारनं कोरोना लसीच्या (Corona Vaccine) आपत्कालीन वापरासाठी कोव्हिशील्ड (Covishield), कोवॅक्सिन (Covaccine) आणि झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) लसीला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) लसीकरणाचा जम्बो प्लॅन (Vaccination Plan) तयार केला असून एका दिवशी 50 हजार लोकांना लस देण्याचं नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. (Suresh Kakani said BMC planning for fifty thousand people corona vaccination per day)

मुंबईतील जम्बो कोविड सेंटरचे रुपांतर जम्बो लसीकरण केंद्रामध्ये

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्यामुळे जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या कमी आहे. यामुळे जम्बो कोविड सेंटरचा वापर लसीकरण केंद्रासाठी करण्यात येईल, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. बिकेसी,नेस्को, दहिसर, मुलुंड, एनएससीआय या ठिकाणी ही जम्बो लसिकरण केंद्रे सुरु करण्यात येतील. कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्र यातील लोकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाणार आहे. जम्बो कोविड सेंटरच्या मोकळ्या जागेत ही लसीकरण केंद्रे असतील, असं काकाणी म्हणाले.

मुंबईत 100 लसीकरण केंद्रांची तयारी

मुंबईत लसीकरणासाठी 100 केंद्र तयार करण्यात येतील. या केंद्राद्वारे एका दिवशी 50 हजार लोकांना लस टोचण्यात, येईल असं सुरेश काकाणी म्हणाले. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात 10 हजार लोकांपासून सुरुवात करण्यात येणार आहे, असं सुरेश काकाणी म्हणाले. प्रत्येक वॉर्ड मध्ये किमान ५ लसीकरण केंद्रे असतील,अशी तयारी सध्या सुरु असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण मुंबईत सध्या नाही. ब्रिटनहून आलेले 26 प्रवासी कोरोनाबाधित आढळले होते.सध्याच्या घडीला त्यांपैकी १४ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकही नव्या स्ट्रेनचा पेशंट सध्या नाही. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे कोरोना बाधित रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले आहेत त्याचा रिपोर्ट मिळणे बाकी आहे, असं सुरेश काकाणी म्हणाले.

मुंबईमध्ये रविारी कोरोनामुळे केवळ ३ मृत्यू

मिशन सेव्ह लाईव्हज चा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. गंभीर पेशंटलासुद्धा मेंटल हेल्थ ट्रेटमेंट द्वारे आपण उपचार दिले. कोरोनाशी आपण लढू शकतो हा विश्वास या निमीत्तानं निर्माण झालाय. त्यामुळे रविवारी केवळ 3 जणांचा मृत्यू झाल्याचे सुरेश काकाणी म्हणाले.

पोलीस बंदोबस्तात लस आणणार

मुंबईत नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वितरण यंत्रणा कोविड – 19 या लस वितरणासाठी वापरण्यात येईल. तसेच मध्यवर्ती लससाठा शीतगृहापासून लसीकरण केंद्रापर्यंत लस वाहतुकीसाठी पोलिस बंदोबस्त अंतर्गत अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत.

कांजूरमध्ये प्रादेशिक लस स्टोअर

कोविड 19 लसीकरणासाठी कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस स्टोअर (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही कोविड स्टोरेज सुविधा विकसित करण्यात येत असून त्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

8 रुग्णालयांमध्ये लस टोचली जाणार प्रारंभी लसीकरणासाठी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. या ठिकाणी रुग्णांना लस टोचली जाणार आहे.

संबंधित बातम्या:

‘मिशन लसीकरण’; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!

केईएम, शीव, कूपर, नायरसह 8 ठिकाणी लसीकरण केंद्रे; वाचा मुंबईत कुठे, कसे होणार लसीकरण!

(Suresh Kakani said BMC planning for fifty thousand people corona vaccination per day)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.