‘निवडणूक गुजरातची असो की महाराष्ट्राची, तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरे यांचीच’, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

सुषमा अंधारे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची केलेल्या नकलेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली.

'निवडणूक गुजरातची असो की महाराष्ट्राची, तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरे यांचीच', सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
सुषमा अंधारे
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 9:26 PM

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने आज ट्विटरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना दिसत आहेत. या व्हिडीओतून रविंद्र जडेजा गुजरातच्या नागरिकांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करतोय. खरंतर त्याच्या पत्नीला गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर उमेदवारी मिळालीय. त्यामुळे त्याने गुजरातच्या नागरिकांना बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करत प्रचार करण्याचा प्रयत्न केला. रविंद्र जडेजाने शेअर केलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या व्हिडीओवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

“मी तो व्हिडीओ बघितलाय. ज्या पद्धतीने तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आलाय, त्याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्माने काहीच होत नाही. काही जरी झालं तरी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची गरज लागते. निवडणुका गुजरातच्या असोत किंवा महाराष्ट्राची असो, तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरे या नावाचीच लागते”, असं सुषमा अंधारे म्हणाले.

“नरेंद्र मोदींच्या नावाने मते मिळत नाहीत याची खात्री झाल्यावरच जडेजा, या-त्या लोकांना बाळासाहेब यांचे नाव घ्यावे लागते. हा शिवसेनेचा विजय आहे आणि ही भारतीय जनता पार्टी आणि मोदी यांची गुजरातमध्ये हार आहे”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, सुषमा अंधारे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची केलेल्या नकलेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली.

“काही लोकांना प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. काही लोकांना संवेदना नावाची गोष्ट नसते. त्यामुळे ते संवेदनशून्यतेने कायम वागत असतात. आपला विरोधक कोण आहे? यापेक्षा कुटुंबियांवर वार करण्यामध्ये त्यांना जास्त मजा येते. त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही”, अशी टीका त्यांनी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.