Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या परीक्षेतील पराभव म्हणजे शेवट नसतो, अंधारानंतर प्रकाश दिसतो, स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर शिवदीप लांडेंचा युवकांना सल्ला

महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

नोकरीच्या परीक्षेतील पराभव म्हणजे शेवट नसतो, अंधारानंतर प्रकाश दिसतो, स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर शिवदीप लांडेंचा युवकांना सल्ला
शिवदीप लांडे, स्वप्नील लोणकर
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 4:58 PM

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर शनिवारी रात्री  पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar ) असं या तरुणाचं नाव आहे. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससीची (MPSC Main Exam) मुख्य परीक्षा 2019 मध्ये उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्यानंतर मुलाखत झाली नव्हती. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. (Swapnil Lonkar suicide Police officer Shivdeep Lande wrote facebook post and appeal to students dont end life due to failure in exam of Job)

शिवदीप लांडे काय म्हणाले?

नोकरीच्या परीक्षेत पराभूत होणं हा काही जीवनाचा शेवट नसतो. जीवन खूप सुंदर आणि आशादायी असतं. आपल्या जीवनात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं आपण थकलोय, पुढं काहीही दिसत नाही. परंतु अंधारानंतरच प्रकाश दिसू लागतो. मी देखील हा अनुभव अनेकदा घेतला त्यानंतर धैर्य न हारता निरंतर पुढं जात राहिलो आणि ध्येय गाठलं. जर मला सरकारी नोकरी मिळाली नसती तर कोणताही रोजगार करुन आपल्या कुटुंबाची जबाबदारी मनपूर्वक पार पाडली असती. कारण माझ्या आयुष्यावर केवळ माझा हक्क नाही. प्रत्येक पराभवातून आपल्याला शक्ती घेतली पाहिजे. पराभवाला विजयात बदलण्याची ताकद असणाऱ्यांना संपूर्ण जग सलाम करतं, अशी फेसपूक पोस्ट शिवदीप लांडे यांनी केली आहे.

प्लॅन बी तयार ठेवा

सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे. “मी पुन्हा पुन्हा सांगतोय , स्पर्धा परीक्षा Plan-B ठेवा. Plan-A हा इतर नोकऱ्या, व्यवसाय किंवा शेती हाच असावा. जीवन अमूल्य , सुंदर आहे.”, असं महेश झगडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

स्वप्नीलने सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?

पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. 24 वय संपत आलं आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला माफ करा, 100 जीव वाचवायचे होते, मला डोनेशन करुन मात्र आता 72 राहिले

स्वप्नीलने टोकाचं पाऊल का उचललं?

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

संबंधित बातम्या:

युवी पिढी नैराश्यात, MPSC परीक्षा घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या; रोहित पवार यांची सरकारला विनंती

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

(Swapnil Lonkar suicide Police officer Shivdeep Lande wrote facebook post and appeal to students dont end life due to failure in exam of Job)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.