भायखळा ते ‘इसिस’ व्हाया जम्मू-काश्मीर, एनआयएने अतिरेक्यांचे मॉड्यूल उलगडले

pune isis module case | पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. मुंबईतील भायखळातील रहिवासी तबीश सिद्दीकी याच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात त्याच्या भायखळा ते इसिस प्रवासाची माहिती दिली आहे.

भायखळा ते 'इसिस' व्हाया जम्मू-काश्मीर, एनआयएने अतिरेक्यांचे मॉड्यूल उलगडले
nia
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 12:06 PM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई, दि. 2 जानेवारी 2024 | पुणे शहरात उघड झालेले इसिस मॉड्यूल प्रकरण देशभर गाजले. पुण्यातून सुरु झालेल्या इसिस मॉड्यूलमधील अतिरेक्यासंदर्भात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इसिस मॉड्यूलमधील हे दहशतवादी उच्चशिक्षित होते. त्यातील एकाला तब्बल ३१ लाख रुपयांचे पॅकेज होते. त्यानंतरही त्यांनी देशविघाक कृत्य केले. साताऱ्यातील जंगलात बॉम्बस्फोटची चाचणी केली. या दहशतवाद्यांनी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडण्याची योजना तयार केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुंबईतील भायखळातील रहिवासी तबीश सिद्दीकी याच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात त्याच्या भायखळा ते इसिस प्रवासाची माहिती दिली आहे. तो २०१८ साली जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये आठवडाभर राहिला. त्या ठिकाणावरुन इसिसला माहिती दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

काय म्हटले आरोपपत्रात

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात भायखळ्यातून तबीश हा जम्मू काश्मीरमध्ये गेले. त्या ठिकाणी राहून तो आयसीसला माहिती पुरवत होता. आयसीसच्या संपर्कात असल्याने राष्ट्रीय तपास संस्थेने तबीश सिद्दीकी याला अटक केली होती. आता एनआयएने तबीश सिद्दीकीसहित ६ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, जम्मूच्या कुपवाडामध्ये तबीश आठवडाभर राहिला. तेथून आयसीसला जम्मूमधली परिस्थिती आणि इतर माहिती तो देत होता. जम्मू काश्मीरमध्ये आयसीस वाढवण्यासाठी काय करता, येईल यावरही तो चर्चा करत होता.

भिवंडीत पडघा गावामध्ये बैठका

इसिस मॉड्यूलमधील दहशतवाद्यांनी आपले स्थळ भिवंडीमधील पडघा केले होते. त्यांनी पडघा गावाला अल् शाम नाव ठेऊन त्याला सिरीयाचा भाग म्हणून जाहीर केले होते. या गावात देशभरातून आलेल्या अनेकांना प्रशिक्षण देण्याची तयारी होती. अतिरेक्यांच्या पडघा गावात अनेक मिटिंग्स झाल्या होत्या, असेही एनआयएने आरोपपत्रात म्हटलंय. एनआयएने महाराष्ट्र आयसीस मॉड्यूल प्रकरणात अटक केलेले जुलफीकार बरोडावाला आणि आणखी एक आरोपी आयटी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. तसेच जुलफीकारला वर्षकाठी ३१ लाखांचे पॅकेज होत अशी माहिती एनआयएने दोषारोपपत्रात दिलीय.

हे सुद्धा वाचा

ही ही वाचा…

महाराष्ट्रातील या गावास अतिरेक्यांनी स्वतंत्र केले घोषित, नाव ‘अल शाम’ दिले, अतिरेक्यांची भरती…

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.