तेलुगु सुपरस्टार पवन कल्याणचे मराठीतून तडाखेबंद भाषण, नांदेडमध्ये शिट्ट्या, टाळ्यांचा पाऊस, जनतेने असं घेतलं डोक्यावर, Video पाहीला का?

Telegu Superstar Pawan Kalyan : तेलुगु सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या मराठातील भाषणाची राज्यात एकच चर्चा सुरू आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नांदेड जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठीतील भाषणाने सर्वांची मनं जिंकली.

तेलुगु सुपरस्टार पवन कल्याणचे मराठीतून तडाखेबंद भाषण, नांदेडमध्ये शिट्ट्या, टाळ्यांचा पाऊस, जनतेने असं घेतलं डोक्यावर, Video पाहीला का?
पवन कल्याण यांचं मराठीतून भाषण
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 4:05 PM

तेलुगु सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मराठीतून भाषण केले. अगदी काही मिनिटांच्या या मराठी संवादाने त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची मनं जिकंली. त्यांच्या भाषणानं एक औरच रंगत आणली. यावेळी जनतेतून टाळ्या, शिट्यांनी मैदान दणाणून गेले. त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्यांच्या मराठीतील भाषण लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यांच्या भाषणाचा Video समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

नांदेड जिल्ह्यात दोन सभा

हे सुद्धा वाचा

पवन कल्याण हे शनिवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यात पाळज आणि देगलूर येथे सभा घेतली. या सभेतील त्यांचे मराठीतील भाषण चांगलेच गाजले. भोकर येथील भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. त्यानंतर जितेश अंतापुरकरांसाठी त्यांनी देगलूर येथे सभा घेतली.

मराठीतून केली भाषणाची सुरुवात

या सभेत पवन कल्याण यांच्या भाषणाची सर्वाधिक चर्चा झाली. मी मराठीत बोलताना चुकलो तर मला माफ करा अशी सुरूवात त्यांनी केली. संतांची भूमी, वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र, या भूमीतील संतांना, छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो. माझ्या लाडक्या भावांना, लाडक्या बहि‍णींना नमस्कार करतो. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येता आलं, याचा मला आनंद आहे. रामराम महाराष्ट्र. या मराठ्यांच्या भूमीत सन्मान आहे. स्वराज्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान नेत्याच्या भूमीवर आहे, असे पवन कल्याण म्हणाले.

त्यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. जनसेने या आपल्या पक्षाच्या सात तत्त्वांपैकी एक राष्ट्रवाद आणि प्रादेशिकता यांचे मिश्रण बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांनी प्रेरित असल्याचे ते म्हणाले. लाडक्या बहीण योजनेचे त्यांनी कौतुक केले. या योजनेमुळे महिलांची आर्थिक उन्नती होईल असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उमेदवारांना निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.