AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar Birthday | निवृत्तीनंतरही सचिनची कमाईत जोरदार बॅटिंग; 1090 कोटींपेक्षा अधिक संपत्ती

जगभरातील 100 नामांकित ब्रँडच्या जाहिराती करणारा तो एक आघाडीचा सेलेब्रिटी आहे. विविध जाहिरातींमध्ये फिलिप्स, ब्रिटानिया, वीजा, बीएमडब्ल्यू, पेप्सी, ल्यूमिनस यांसारख्या अनेक मोठ्या ब्रॅण्डचा समावेश आहे. (Tendulkar's strong batting in income even after retirement; Wealth over Rs 1090 crore)

Sachin Tendulkar Birthday | निवृत्तीनंतरही सचिनची कमाईत जोरदार बॅटिंग; 1090 कोटींपेक्षा अधिक संपत्ती
निवृत्तीनंतरही सचिनची कमाईत जोरदार बॅटिंग
| Updated on: Apr 24, 2021 | 7:55 PM
Share

मुंबई : संपूर्ण कारकिर्दीत क्रिकेटचे मैदान गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवृत्तीनंतरही जोरदार बॅटिंग सुरूच आहे. अर्थात ही बॅटिंग मैदानावरची नाही, तर कमाईतील आहे. नवनवे विश्वविक्रम करीत कोट्यवधींच्या संपत्ती जमवू शकलेल्या सचिनने निवृत्तीनंतरही कमाईचा हाच धडाका कायम राखला आहे. सचिन म्हणजे क्रिकेटचा देव. आज त्याचा 48 वाढदिवस साजरा होतोय, याचदरम्यान त्याचे ऐश्वर्य, आलिशान राहणीमान पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. त्याची सध्याच्या घडीला 1090 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. (Tendulkar’s strong batting in income even after retirement; Wealth over Rs 1090 crore)

सचिन क्रिकेटमधून निवृत्त होऊन आठ वर्षे झाली आहेत, माझी त्याची लोकप्रियता आजही ‘जैसे थे’ आहे. तो सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटपटूपैकी एक आहे. त्याच्या जवळ शानदार, आलिशान गाड्यांबरोबर अनेक महागडी घड्याळे आहेत. त्याची जाहिरातींच्या माध्यमातून जबरदस्त कमाई होत आहे. जगभरातील 100 नामांकित ब्रँडच्या जाहिराती करणारा तो एक आघाडीचा सेलेब्रिटी आहे. विविध जाहिरातींमध्ये फिलिप्स, ब्रिटानिया, वीजा, बीएमडब्ल्यू, पेप्सी, ल्यूमिनस यांसारख्या अनेक मोठ्या ब्रॅण्डचा समावेश आहे. सचिनने ”ट्रू ब्लू’ नावाने एक फॅशन ब्रँडसुद्धा लाँच केला होता. या ब्रॅण्डची अरविंद फॅशन कंपनीबरोबर टाय-अप आहे. ‘ट्रू ब्लू’ कंपनी पुरुषांसाठी नवनवीन पॅटर्नचे कपडे बनवते. यात शर्ट, टी-शर्ट, ट्राउजर, जॅकेट, ब्लेझर, डेनिम आणि जीन्सचा समावेश आहे.

बीसीसीआयला कर्ज फेडण्यासाठी केली होती मदत

सचिन तेंडुलकरने बीसीसीआयला कर्ज फेडण्यासाठी मदत केली होती. सचिन 2001 साली एमआरएफ टायर कंपनीचा ब्रँड अँबेसेडर बनला होता. त्याने कंपनीच्या बरोबरीने 100 कोटींचा करार केला होता. असा करार करणारा तो पहिला क्रिकेटपटू होता. कराराच्या माध्यमातून सचिनला खूप फायदा झाला होता. त्या पैशातून त्याने बीसीसीआयला कर्ज फेडण्यासाठी मोठी मदत केल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून पुढे आले होते.

ट्रॅव्हल्स कंपनीत भागीदारी

सचिनची ‘मुसाफिरडॉटकॉम’ या ट्रॅव्हल्स कंपनीबरोबर भागीदारी आहे. ही एक यूएई बेस्ड कंपनी आहे. सचिनने ऑक्टोबर 2013 मध्ये यातील 7.5 टक्के भागीदारी खरेदी केली होती. याशिवाय त्याने काही स्टार्टअप बिझनेसमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच हैदराबादमध्ये टेक फर्म स्मार्टन इंडिया या स्मार्ट डिव्हाईस बनवणाऱ्या कंपनीतही गुंतवणूक केलेली आहे.

व्हर्चुअल मनोरंजक कंपनीतही गुंतवणूक

सचिन हा ‘तेंडुलकर स्पोर्ट्स फर्म स्मॅश’चा सहसंस्थापक आहे. या कंपनीत त्याची 18 टक्के भागीदारी आहे. ही एक व्हर्चुअल मनोरंजक कंपनी आहे. सचिनने बहुतांश गुंतवणूक भारतीय कंपन्यांमध्ये केली आहे.

व्हर्च्युअल करमणूक कंपनीमध्ये देखील गुंतवणूक

तंतुलकर स्पोर्ट्स फर्म स्मासेसचे ओनर देखील आहेत. या कंपनीत त्यांच्या 18 फीड भागधारक आहेत. ही एक व्हर्च्युअल मनोरंजन कंपनी आहे, ज्यात २०० में मध्ये सुरु झालेल्या स्मॅश प्लेनर्स आधारित आहेत. सचिन बहुतेक गुंतवणूकीत भारतातील कंपन्यांना पसंती देत ​​आहेत. (Tendulkar’s strong batting in income even after retirement; Wealth over Rs 1090 crore)

इतर बातम्या

“इथं पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही, पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का ?”: जयश्री पाटील

आमचे आमदार वारले, मतदारसंघात न फिरकल्याने पोस्ट व्हायरल, आमदारांकडून पोलिसात तक्रार

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.