मुंबईवर 26/11 पेक्षाही मोठा हल्ला करू; मुंबई पोलिसांना आले 26 मेसेज; विरारमधून एकाला ताब्यात
मुंबईः मुंबईवर 26/11 सारखा हल्ला (26/11 Attack) करुन मुंबई शहर उडवून देण्यारे मेसेज मुंबई पोलिसांना आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. असे 26 मेसेज पोलिसांना आले असले तरी मुंबई पोलिसांनीही खबरदारीचा इशारा म्हणून सुरक्षेत प्रचंड वाढ करून या मेसेज प्रकरणाचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी सशस्त्र सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच शुक्रवारी रात्री मुंबई […]
मुंबईः मुंबईवर 26/11 सारखा हल्ला (26/11 Attack) करुन मुंबई शहर उडवून देण्यारे मेसेज मुंबई पोलिसांना आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. असे 26 मेसेज पोलिसांना आले असले तरी मुंबई पोलिसांनीही खबरदारीचा इशारा म्हणून सुरक्षेत प्रचंड वाढ करून या मेसेज प्रकरणाचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी सशस्त्र सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात मुबारक हो मुंबई में हमला होने वाला है, असे धमकीचे 26 मेसेज (26 message Mumbai Police) मुंबई पोलिसांना आले आहेत. मुंबईला उडवण्याची तयारी सुरू आहे 26/11 सारखा किंवा त्यापेक्षा मोठा हल्ला करण्याकरिता काही हिंदुस्तानी लोक माझ्यासोबत असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. ज्या नंबरवरून हे मेसेज आले आहेत तो नंबर पाकिस्तानचा असल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.
#UPDATE | Mumbai police crime branch has detained a person from Virar area in connection with a 26/11-like terrorist attack threat message that was received by Mumbai traffic police. Further interrogation underway: Mumbai Police https://t.co/5ClVgB8JQR
— ANI (@ANI) August 20, 2022
दरम्यान या प्रकरणी विरारच्या भाटपाडामधू मोहम्मद असेच या 22 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली असून हा मेसेज कुठून आणि कसा आला त्याचीही इतर यंत्रणामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पाकिस्तानातून मेसेज
राज्यासह मुंबईत शुक्रवारी गोपाळकाला सर्वत्र जल्लोषात साजरा होत असतानाच रात्री पावणे अकराच्या दरम्यान वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एका व्हाट्सअप नंबरवर धमकीचे 26 मेसेज आणि दोन स्क्रीनशॉट आले होते. मेसेज करणाऱ्याने तो पाकिस्तानी असल्याचे सांगत मुंबईवर 26/11 सारखा किंवा त्यापेक्षा मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली. त्यासाठी आम्ही तयार असून काही हिंदुस्तानी लोक माझ्यासोबत आहेत शिवाय अजमल कसाब हलवाई यासारख्या कुख्यात दहशतवाद्यांच्या नावांचा उल्लेखदेखील मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
बरोबर हिंदुस्थानातील 6 जण
धमकीच्या मेसेज बरोबर हिंदुस्थानातील सहा जणांचे नंबरदेखील पाठवण्यात आले आहेत. माझे लोकेशन इकडेच दाखवले पण काम मुंबईत चालेल असा मेसेजही पाठवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक विभागाकडून लगेच याबाबत मुंबई पोलीस एटीएसच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सांगण्यात आल्यानंतर धमकीच्या संदेशावरून अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड विधान कलम 506/2 अन्वेय वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत महत्वाच्या ठिकाणी प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.
मोबाईल पाकिस्तानातील लाहोरमधील
मोबाईल नंबर पाकिस्तानच्या लाहोर येथील मोहम्मद इम्तियाज नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजले आहे. मोहम्मद हा येथील शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याकडे कामाला आहे त्याचा मोबाईल चोरीला तर गेलाच आहे, पण तो अँड्रॉइड फोन नाही त्यामुळे त्या नंबर वरून व्हाट्सअप मेसेज आलाच कसा असंही त्याचे म्हणणे आहे.
पोलीस कार उडवून देण्याचा कट
पंजाब पोलीस दलातील उपनिरीक्षकाच्या गाडीखाली आयडी ठेवून ती उडवून देण्याचा कट असणारा मुख्य सूत्रधार दहशतवादी राजेंद्र कुमार उर्फ भाऊ रामकुमार विधिला शिर्डीतून अटक करण्यात आली अहमदनगर पोलीस आणि नाशिक एटीएस पथकाने हे संयुक्त कारवाई केल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली आहे. दहशतवादी राजेंद्र कुमार याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने ट्रांजिट रिमांड मंजूर केल्याने त्याला अमृतसर पोलीस आयुक्तालयाचे स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत आहे. दरम्यान राजेंद्र कुमार शिर्डीत कुठे कुठे राहिला आणि त्याच्या साथीदार होते का याचा तपास पोलीस करीत आहेत
मुंबईकरांनी काळजी करू नये
या दहशतवादी मेसेजेसची आणि गंभीरपणे दखल घेण्यात आली असून मुंबईकरांनी काळजी करू नये निर्धास्त राहावे असे सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहे ज्या नंबर वरून हे मेसेज आले तो नंबर पाकिस्तानचा कोड असल्याचे फणसाळकर यांनी सांगितले आहे.
अन्य तपास यंत्रणाही सतर्क
या मोबाईल नंबरचा शोध घेतला जाणार असून या तपासासाठी एटीएस बरोबरच अन्य तपास यंत्रणाही संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईच्या सागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून मुंबईचे सागरी कवच अधिक सक्षम करण्यासाठी तटरक्षक दलाच्या समन्वयाने काम सुरू असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. हा मेसेज आला असला तरी मुंबईतील सुरक्षेत कोणतीही कसूर सोडण्यात आली नसून नागरिकांनी निर्धास्त राहावे असंही सांगण्यात आले आहे.