किराणा दुकानांची नवी वेळ आज ठरणार; लॉकडाऊन आणखी कठोर होणार?; ठाकरे सरकारच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष
अत्यावश्यक सेवेतील दुकानाची वेळ कमी केली तर एकाच वेळी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढेल. | Thacekray govt shops
मुंबई: राज्यात कठोर निर्बंध लागू करुनही कोरोनाच्या प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे आता ठाकरे सरकार (Thackeray govt) अत्यावश्यक सेवांच्या यादीत असलेल्या किराणा दुकाने सुरु ठेवण्याची वेळही कमी करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Thackeray govt cabinet meet today may take decision about shops and strict lockdown)
संभाव्य निर्णयानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच खुली राहणार आहेत. या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. सरकारला विनंती आहे की, अत्यावश्यक सेवेतील दुकानाची वेळ कमी केली तर एकाच वेळी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढेल, असा युक्तिवाद व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला आहे.
महाराष्ट्र उद्योग व व्यापारी चेंबरनेदेखील (केमिट) सध्याच्या निर्बंधात बदल करण्याची मागणी केली आहे. सध्याचे निर्बंध कायम ठेवायचे असल्यास वीज शुल्कात सवलतीची गरज आहे. एखाद्या कार्यालय किंवा दुकानातील कर्मचारी करोना संक्रमित झाल्यास त्याचा भार मालकावर येण्याऐवजी त्या कर्मचाऱ्याचे उपचार ईएसआयसीच्या माध्यमातून व्हायला हवे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
लॉकडाऊन आणखी कठोर होणार का?
राज्यात संचारबंदी लागू होऊनही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणावा तसा आटोक्यात येताना दिसत नाही. यावर लॉकडाऊन आणखी कठोर करणे हाच एकमेव उपाय आहे, असा मतप्रवाह ठाकरे सरकारमध्ये आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतही केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक
देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असल्यामुळे आता केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे मंगळवारी देशातील लस उत्पादकांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचीही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी एखादा महत्त्वाचा निर्णय घेतात का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत
हेही वाचा :
मोठी बातमी, 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार