केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आठवले म्हणतात, राज्य सरकार गलथान, 5 लाख लसी फुकट घालवल्या

महाराष्ट्राला लागेल तेवढ्या कोरोना लसींचा पुरवठा केंद्र सरकार करेल. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे. | covid vaccine Ramdas Athawale

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आठवले म्हणतात, राज्य सरकार गलथान, 5 लाख लसी फुकट घालवल्या
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 2:32 PM

मुंबई: राज्य सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात 5 लाख लसी वाया गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. महाराष्ट्रात अद्याप 23 लाख लसींचा साठा शिल्लक आहे. पुढची खेप येईपर्यंत या साठ्याचा योग्यपणे वापर करावा, असे रामदास आठवले यांनी सांगितले. (Union minister Ramdas Athawale take a dig at Mahavikas Aghadi govt)

रामदास आठवले यांनी शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा पडू देणार नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन यावेळी डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.

ठाकरे सरकार केंद्रावर करत असलेले आरोप चुकीचे: आठवले

महाविकासआघाडी केंद्र सरकारवर लसीच्या तुटवड्यासंदर्भात करत असलेले आरोप चुकीचे आहेत. कोरोना लसीकरणावरुन राज्य सरकारने राजकारण करू नये. त्याऐवजी योग्य नियोजन करून लसीकरण सुलभ करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. महाराष्ट्राला केंद्र सरकार ने यापूर्वीच 1कोटी 6 लाख कोरोना लसीचा पुरवठा केला आहे.त्यातील 5 लाख लसी महाराष्ट्र सरकारने वाया घालविल्या त्यास जबाबदार कोण? असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राला लागेल तेवढ्या कोरोना लसींचा पुरवठा केंद्र सरकार करेल. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

भाजप नेत्यांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, लोकांचे जीव वाचले पाहिजेत: वडेट्टीवार

पुढच्या दहा दिवसांत महाराष्ट्रात 10 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विरोधकांनी यावर राजकारण न करता आम्हाला उपाय सुचवावेत. सध्याच्या घडीला देशाच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन आहे.

गुजरातमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. मात्र, भाजपचे नेते त्यावर काही बोलत नाहीत. फक्त महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर भाजपचे नेते टीका करायला सुरुवात करतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये. गेल्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’

महाराष्ट्राला कोरोना लसीचा मुबलक पुरवठा का नाही?, सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine हॅशटॅग ट्रेंडमध्ये

‘जेवढे प्रयत्न सरकार पाडण्यासाठी करताय तेवढे राज्याच्या हितासाठी करा’, रोहित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.