आम्ही शिंदे गटाची दखल घेतच नाही, त्यांचा शेवट आम्हाला माहितीय, या नेत्याने त्यांचं भविष्यच सांगितलं

शिंदे गटाच्या भविष्यातील राजकारणाकडे कसे पाहता असा प्रश्न विचारल्यानंतर विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गटाची दखल घेण्याची आम्हाला गरज नाही. शिंदे गटाचा शेवट आम्हाला माहिती आहे.

आम्ही शिंदे गटाची दखल घेतच नाही, त्यांचा शेवट आम्हाला माहितीय, या नेत्याने त्यांचं भविष्यच सांगितलं
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 10:11 PM

मुंबईः शिंदे गटाचे आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेल्या नंतर ठाकरे गटावर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आजही कामाख्या देवीच्या दर्शनावरून खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करताना त्यांनी कामाख्या देवी ही जागरूक देवी आहे. त्यामुळे ही देवी पापी लोकांना माफ करणार नाही अशी बोचरी टीका विनायक राऊत यांनी त्यांच्यावर केली आहे.

त्यांच्या पापाचे घडे भरले की या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही देवी त्यांना शिक्षा देईल अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलेली याचिका ही सत्याच्या बाजूची याचिका आहे. त्यामुळे या निकालाकडे आम्ही आशेने बघत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार विनायक राऊत यांना शिंदे गटाच्या भविष्यातील राजकारणाकडे कसे पाहता असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, शिंदे गटाची दखल घेण्याची आम्हाला गरज नाही. शिंदे गटाचा शेवट आम्हाला माहिती आहे.

त्यामुळे आमची खरी लढाई ही उद्दाम भाजप बरोबर असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. तर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याविषयी बोलतानाही त्यांनी सांगितले की, जे नेते अनेक घरं फिरून शिवसेनेत आले आहेत.

त्यांना शिवसेनेने भरभरून दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना संपवण्याच्या मार्गावर कोणी लागू नये. जे शिवसेना संपवायच्या मार्गावर लागतील त्यांना शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाही अशा इशाराही विनायक राऊत यांनी उदय सामंत यांना दिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.