माहीममधून ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा विजय, अमित ठाकरे पराभूत
माहीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी विजय मिळवला आहे. सदा सरवणकर यांना ही पराभवाचा धक्का बसला आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीमध्ये अखेर ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. या तिन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर होईल असं वाटत होतं. पण अखेर महेश सावंत यांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात जुन्या चाळी आणि इमारतींचा पुनर्विकास, पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली.
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी जनतेकडून वेगळी सहानुभूती होती. येथे सदा सरवणकर हे देखील मैदानात असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये टफ फाईट झाली. अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर होते. सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पहिल्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत होते. त्यांनी आधीपासून लीड कायम ठेवली.
मच्छिमार वसाहत इमारतींचा पुनर्विकास असो किंवा पोलीस बांधवांना सुरक्षित घरे देण्याचा मुद्दा असो. अमित ठाकरे यांनी या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी स्थानिक मुद्द्यांना हात घातला होता. पण तरी देखील त्यांचा पराभव झाला आहे.
17 व्या फेरीअखेर महेश सावंत यांना ४७,३८१ मते मिळाली. शिवसेनेचे संदा सरवणकर यांना ४६,३३७ मते मिळाली. तर मनसेचे अमित ठाकरे यांना ३१६११ मते मिळालीत. या फेरीत महेश सावंत फक्त ९४४ मतांना आघाडीवर होते.
अमित ठाकरे यांनी आपला पराभव मान्य केला आहे. ते म्हणाले की, मला जनतेचा कौल मान्य आहे. कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे.