AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांचा मनस्ताप वाढला, वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वाहन चालकाची नवी युक्ती

नेहमी नियम मोडणारे अनेक वाहन धारक बनावट व स्टायलिश नंबरप्लेटचा वापर करत आहेत. वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वाहनचालकांकडून ही युक्ती केली जात आहे. यामुळे वाहतूक पोलिसांसमोर आता नवीन समस्या निर्माण झाली आहे.

पोलिसांचा मनस्ताप वाढला, वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वाहन चालकाची नवी युक्ती
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 2:32 PM

सुनील जाधव, डोंबिवली : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई पोलिसांकडून केली जाते. त्यानंतर कॅमेऱ्याने टिपलेल्या वाहनाच्या नंबरवरून वाहनधारकाला मेमो पाठवला जातो.  मात्र या कारवाईतून वाचण्यासाठी किंवा वाहनचालकानी नामी शक्कल लढवली आहे. या प्रकारामुळे पोलिसांना मनस्ताप वाढला आहे. कारण या प्रकारमुळे ज्याची चूक नाही, त्याला शिक्षा होत आहे. मग पोलिसांना सत्यशोधन करत ते चलन रद्द करावे लागत आहे. या प्रकारास कसे रोखावे? हा प्रश्न पोलिसांना पडलाय.

नेमके काय झाले

हे सुद्धा वाचा

वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक जण बनावट व स्टायलिश नंबरप्लेटचा वापर करत आहेत. यामुळे ज्या नियम मोडला नाही, असा व्यक्तीकडे चलन जात आहे. त्या वाहनचालकांना नाहक मनस्तापासह आर्थिक भुर्दंडांला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाच्या महाट्रफिक ॲपवर तक्रार करुनही योग्य मदत मिळत नाही.

असा घडला प्रकार

कल्याण परिसरात राहणाऱ्या सूचिता साळवे या तरुणीकडे MH-05 DR 4962 नंबर प्लेटची गाडी आहे. त्यांचे लग्न फेब्रुवारीमध्येच पेणमध्ये झाले. यामुळे त्यांच्या गाडीचा वापर कोणीही करत नाही. त्यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नसतानाही त्यांना कल्याण वाहतूक पोलिसांकडून मेमा आला. त्यात वाहतूक नियम तोडल्याचे नमूद करत 500 रुपयाचं दंड भरण्याचे म्हटले आहे. चलानाबरोबर असलेल्या फोटोत असलेल्या दुचाकीचा नंबर त्यांचा गाडीचा होता. परंतु ती दुचाकी आणि आपली दुचाकी या दोन्ही वेगवेगळ्या कंपनीच्या असतानाही आमच्या गाडीला चलन आले कसे असा प्रश्न त्यांना पडला.

का होताय असे प्रकार

नेहमी नियम मोडणारे अनेक वाहन धारक बनावट व स्टायलिश नंबरप्लेटचा वापर करत आहेत. वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वाहनचालकांकडून ही युक्ती केली जात आहे. बनावट व स्टायलिश नंबरप्लेटचा वापरत असल्याने मोटारीचे मूळ मालक व वाहतूक पोलिसांना वाहतूक चलानचा ताप वाढला आहे. गाडी नंबर व्यवस्थित मिळत नसल्याने भलत्यालाच दंड आकारत असल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

काय आहे मागणी

ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यांवर वाहतूक शाखेने कारवाई करावी, अशी मागणी सुचिता साळवे व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत वाहतूक पोलिसांना त्यांनी माहिती दिली आहे. वाहतूक पोलिसांनी बनावट नंबर प्लेट व खरी नंबर प्लेट यामधील फरक समजून चलन पाठवावे, तसेच बनावट नंबर प्लेट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

हे ही वाचा

अरे वा, पुणेकर वाहतूक पोलीसही वेगळाच, हेल्मेट जनजागृतीसाठी श्वानाचा असा केला वापर, पाहा Video

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.