AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात विचित्र अपघात, पुलावरील अपघातग्रस्त ट्रकमधील पुठ्ठ्यांचे गठ्ठे गाडीवर पडले, एकाचा मृत्यू

रात्री 10.30 च्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडजवळ वाघबिळ उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला. (Thane truck accident at waghbil flyover)

ठाण्यात विचित्र अपघात, पुलावरील अपघातग्रस्त ट्रकमधील पुठ्ठ्यांचे गठ्ठे गाडीवर पडले, एकाचा मृत्यू
| Updated on: Oct 04, 2020 | 8:09 AM
Share

ठाणे : ठाण्यातील विचित्र अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रात्री 10.30 च्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडजवळ वाघबिळ उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला. (Thane truck accident at waghbil flyover)

ठाण्यातील वाघबिळ उड्डाणपुलावरुन पुठ्ठ्यांनी भरलेल्या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे तो ट्रक थेट उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकला. या ट्रकमध्ये असलेले पुठ्ठ्यांचे गठ्ठे उड्डाणपुलाखाली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीवर पडले. त्यात एका गाडीचा चक्काचूर झाला.

या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर त्या गाडीत असलेली दुसरी व्यक्ती ही गंभीर जखमी झाली आहे. प्रशांत देवरकोंडा असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान घटनास्थळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले आहेत. सध्या चक्काचूर झालेली गाडी रस्त्यावरुन बाजूला करण्यात आली आहे. तसेच हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.(Thane truck accident at waghbil flyover)

संबंधित बातम्या : 

लोकल प्रवासासाठी अवघ्या 500 रुपयात फेक क्यूआर कोड पास, एकाला अटक

मालमत्तेचा वाद, एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या, तिघांचे मृतदेह सापडले

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.