खरं की खोटं हे निवडणूक आयोग ठरवेल, संजय शिरसाट यांचं म्हणणं काय?
युती झाल्यापासून काही लोकं दंड थोपटून बसले आहेत. त्यांना चपराक देणं आवश्यक आहे. त्यासाठी दोन पाऊलं कोण पुढं नि कोण मागं हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नसल्याचंही त्यांनी म्हंटलं.
मुंबई : २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची शेवटची तारीख आहे. वेळ देण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडं केली आहे. प्रातिनिधीक बैठका घेण्याचीही विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, मुळात अशी मागणी करणं हे चुकीचं आहे. पक्ष कोणाचा खरा यावर तुम्ही आपली बाजू कोर्टात मांडता. त्यामुळं निवडणूक आयोगाकडं ही हेरींग चालली ती होऊ दिली पाहिजे होती.
खंडपीठाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आय़ोगानं हेरींग घेऊ नये, असं तुमचं मत होतं. यातून तुमच्या दुटप्पीपणा दिसून येतो. असा टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तुम्हाला भीती कशाची वाटत आहे.
तुम्ही आम्हाला चुकीचं ठरविता. तसा वाद घालता. मग, भीती कशाची वाटली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी मागणी करायला पाहिजे होती. पण, कातडी बचावोचं धोरण सुरू आहे. त्या माध्यमातून त्यांनी केलेली ही एक वेगळी खेळी आहे.
संजय शिरसाट म्हणाले, ते काय बोलतात याला महत्व नाही. आता आपली बाजू ही निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेली आहे. ठाकरे गटाचे साडेतीन हजार बाँड पकडले गेलेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ते खरे की खोटे हे निवडणूक आयोग ठरवेल.
निकालापर्यंत वाट पाहिली पाहिजे
कोणता पक्ष खरा. कोणता पक्ष खोटा. कोणाला काय नाव मिळालं पाहिजे, हे निवडणूक आय़ोगाला ठरवू द्या. जो निकाल लागेल, त्या निकालाला तुम्ही माना. निकाल लागेपर्यंत उगाच बडबड करण्याला काही अर्थ नाही.
आपण चुकीचं काम केलं. शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळणार, हे ठाकरे गटाच्या लक्षात आलं आहे. आपण कमीजोर आहोत, असं माहीत असते, अशावेळी अशी वक्तव्य केली जात असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.
चर्चेतून ठरलं
विधानपरिषदेच्या पाचही जागा भाजपला मिळाल्याची चर्चा आहे. यावर बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितलं की, काल भाजपचे नेते आणि शिंदे गटाचे नेते यांच्यात चर्चा झाली.
युती झाल्यापासून काही लोकं दंड थोपटून बसले आहेत. त्यांना चपराक देणं आवश्यक आहे. त्यासाठी दोन पाऊलं कोण पुढं नि कोण मागं हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नसल्याचंही त्यांनी म्हंटलं.