Ratan Tata : पूर्वजांच्या आठवणीत रतन टाटा झाले भावूक, लागलीच बोलावणे धाडले आर्टिस्टला

Ratan Tata : अनेकांचे आयकॉन उद्योगपती रतन टाटा यांचा कंठ दाटून आला. वाडवडिलांच्या आठवणीचे उमाळे दाटून आले. ते या आठवणीत रममाण झाले. त्यांनी लागलीच चित्रकाराला बोलावणे धाडले.

Ratan Tata : पूर्वजांच्या आठवणीत रतन टाटा झाले भावूक, लागलीच बोलावणे धाडले आर्टिस्टला
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 10:26 AM

नवी दिल्ली : रतन टाटा हे नाव ऐकताच, सर्वांसमोर विनम्र, शालीन आणि हसऱ्या उद्योगपतीचा चेहरा आपल्यासमोर येतो. रतन टाटा (Ratan Tata) भारतातीलच नाही तर जगातील लोकप्रिय उद्योगपती आहे. त्यांचा फॅन फॉलोवर फार मोठा आहे. रतन टाटा यांच्या सद्गुणांचा गुणाकार कैकपटीत आहे. त्यांनी अनेक कुटुंबांना मोठा आधार दिला आहे. टाटा समूहाने देश उभारणीत मोठे योगदान दिले आहे. टाटा समूहाचे (Tata Group) पूर्वीचे चेअरमन, त्यांचे अगाध ज्ञान, शहाणपण आणि दानधर्मासाठी ओळखल्या जात. रतन टाटा हे पण हाच वारसा चालवत आहेत. पण एका घटनेने रतन टाटा भावूक झाले. त्यांना पूर्वजांची कमाई आठवली. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी लागलीच चित्रकाराला बोलावणे धाडले.

आर्टिस्ट असीम पोद्दार यांचे गिफ्ट रतन टाटा यांचे अनेक फॅन्स आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अनेक जण त्यांचे चाहते आहेत. काही निस्सीम भक्त आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काहींनी उद्योगात नाव कमावले आहे. प्रत्येक जण त्यांच्या प्रति आदर व्यक्त करतो. जागतिक चित्रकार असीम पोद्दार (Asim Poddar) हे पण त्यांचे मोठे चाहते आहे. ते मुळचे जमशेदपूरजवळील मानगो येथील रहिवाशी आहे. त्यांनी एक अनोखी भेट रतन टाटा यांना दिली.

कशाचे होते पेटिंग पोद्दार यांनी रतन टाटा यांना एक पेटिंग भेट दिली. या आर्टवर्कमध्ये रतन टाटा हे जमशेदजी टाटा (Jamshedji Tata) यांना फुलांचा हार घालताना दिसत आहे. जमशेदजी टाटा यांनीच टाटा समूहाची सुरुवात केली होती. पोद्दार यांचे हे चित्र लगेच व्हायरल झाले. या चित्रावर कमेंटचा पाऊस पडला. सर्वांनीच चित्राचे कौतूक केले.

हे सुद्धा वाचा

टाटा झाले भावविभोर हे पेटिंग व्हायरल झाले, ते रतन टाटा यांच्यापर्यंत पोहचले. हे पेटिंग पाहताच टाटा यांचा कंठ दाटून आला. ते भावूक झाले. मुंबईतील कुलाबा येथील घरी हे पेटिंग रतन टाटा यांनी पाहिली. या पेटिंगकडे रतन टाटा बराच वेळ पाहत राहिले. या पेटिंगमध्ये ते जमशेदजी टाटा यांना पुष्पहार घालताना दिसत आहे. या पेटिंगने त्यांच्या आठवणी ताज्या केल्या. हे पेटिंग त्यांना खूप आवडले.

तातडीने धाडले बोलावणे रतन टाटा यांनी हे सुबक चित्र तयार करणाऱ्या असीम पोद्दार यांना तातडीने बोलावणे धाडले. या पेटिंगसह त्यांनी पोद्दार यांना घरी बोलावले. मुंबईतील कुलाबा येथील घरी पोद्दार आले. त्यांचे टाटा यांनी कौतूक केले. देशात तरुण प्रतिभावंत कलाकारांची कमी नसल्याचे ते म्हणाले. आपले एक मोठे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. रतन टाटा हे अत्यंत मृदू, शांत आणि सरळ स्वभावाचे धनी असल्याचे पोद्दार यांनी सांगितले. या भेटीने पोद्दार यांना आकाश ठेंगणे झाले. या भेटीने पोद्दार हरकून गेले. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

सोनू सूद पण फॅन असीम पोद्दार हे लोकप्रिय चित्रकार आहेत. परदेशी नागरिक त्यांच्या पेटिंग्स ऑनलाईन खरेदी करतात. अभिनेता सोनू सूद हा पण असीम पोद्दार यांचा चाहता आहे. पोद्दार यांनी सोनू सूद यांची पेटिंग तयार केली होती. ती सोनू सूद यांना आवडली. त्यांनी पण पोद्दार यांना त्याच्या घरी, मुंबईत बोलावले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.