AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच, आज 1118 नवे रुग्ण, रायगडमध्ये एकाचा मृत्य़ू, राज्याची रुग्णसंख्या 1885

मुंबईतील कस्तुरबा प्रयोगशाळेतील ताज्या अहवालानुसार मुंबईत बीए 4 चे 3 तर बीए 5चा एक रुग्ण सापडला आहे. 14 मे ते 24 मे या कालावधीतील हे रुग्ण आहेत. यात दोन 11 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे.

मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच, आज 1118 नवे रुग्ण, रायगडमध्ये एकाचा मृत्य़ू, राज्याची रुग्णसंख्या 1885
covid updateImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 6:32 PM

मुंबई – कोरोनाची (Covid19) रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसते आहे. आज राज्यात (in Maharashtra)1885 रुग्णांचे निदान झाले आहे. तर रायगडमधील एका कोरोना रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक नवी रुग्णसंख्या ही मुंबईत (Mumbai) नोंदवण्यात आली आहे. आज 1118 नवे रुग्ण मुंबईत सापडले आहेत. तर ठाण्यात 167 रुग्ण आढळले आहेत. एकूण मुंबई परिसरात नवी 1703रुग्णसंख्या आहे. पुण्यात 74, पिंपरी चिंचवडमध्ये 22 तर नाशिकमध्ये 14रुग्ण सापडले आहेत. राज्यात एकूण 17480 एक्टिव्ह रुग्ण आहेत.

बीए 4चे तीन आणि बीए 5 व्हेरिएंटचा एक रुग्ण सापडला

मुंबईतील कस्तुरबा प्रयोगशाळेतील ताज्या अहवालानुसार मुंबईत बीए 4 चे 3 तर बीए 5चा एक रुग्ण सापडला आहे. 14 मे ते 24 मे या कालावधीतील हे रुग्ण आहेत. यात दोन 11 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण घरात उपचारादरम्यान बरे झाले आहेत.

काळजी घेण्याची गरज – विजय वडेट्टीवार

तर राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाबाबत सध्या घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होू नये यासाठी वेळेवर शाळा सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंतेचं कारण नसल्याचेही वडेटटीवार म्हणाले आहेत. मास् सक्ती करण्य़ापेक्षा जनतेनं काळजी घेण्याची गरज असल्याचेही मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

महिनाभराने मुख्यमंत्री निर्णय घेणार

सध्या असलेले रुग्म हे क्रिटिकल स्थितीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आधीच्या दोन लाटांमध्ये जेवढी गंभीर स्थिती होती, तेवढी परिस्थिती गंभीर नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. हा महिना सरकार परिस्थितीवर लक्ष  ठेवून आहे. रुग्णसंख्या अधिक झाली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील निर्णय घएतील असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, अन्यथा लाट वाढू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.