आरएसटी- 5 मोनोरेल पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत, MMRDA च्या पुढाकाराने पुनरुज्जीवन

मागील अनेक दिवसांपासून बंद असणारी आरएसटी- 5 ही मोनोरेल आता पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. (RST-5 monorail service)

आरएसटी- 5 मोनोरेल पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत, MMRDA च्या पुढाकाराने पुनरुज्जीवन
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 6:06 PM

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून बंद असणारी आरएसटी- 5 ही मोनोरेल आता पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. दुरुस्ती केलेली नसल्यामुळे तसेच सुटे भाग मिळत नसल्यामुळे ही मोनोरेल बरेच दिवस बंद होती. मात्र, एमएमआरडीएने पुढाकार घेऊन या मोनोरेलचे सुटे भाग उपल्बध केले आहेत. त्यानंतर आता ही रेल्वे मुंबईकरांची ने-आन करण्यास सज्ज झाली आहे. बुधवारपासून ( 16 डिसेंबर) ही मोनोरेल रुळावरुन धावणार आहे. तशी माहिती MMRDA चे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी दिली. (The RST-5 monorail is now back for service)

लॉकडाऊन आणि गर्दी टाळण्याचा उद्देशाने मार्च महिन्यापासून देशातील दळणवळण बंद होते. त्यानंतर अनलॉकअंतर्गत ऑक्टोबर महिन्यापासून मोनोरेलची सेवा पूर्ववत करण्यात आली. या निर्णयांनतर अनेक मोनोरेल रुळावरुन धावू लागल्या. मात्र, आरएसटी- 5 ही मोनोरेल दुरुस्तीअभावी अजूनही रुळावर अतरली नव्हती. (The RST-5 monorail is now back for service)

मागील काही दिवसांपासून आरएसटी- 5 मोनोरेलचे सुटे भाग भारतात मिळत नव्हते. परिणामी या रेल्वेचे दुरुस्तीचे काम रखडले होते. अंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे विदेशातून सुटे भाग मागवणेही एमएमआरडीएला शक्य नव्हते. ही सर्व अडचण लक्षात घेऊन एमएमआरडीए स्व:तच पुढाकार घेत रेल्वेच्या पुनरुज्जीवनासाठी सुटे भाग तयार केले.

आरएसटी-5 भारतीय बनावटीची मोनोरेल

दरम्यान, मुंबईतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एमएमआरडीएने आरएसटी-5 रेल्वे पुन्हा एकदा रुळावर उतरवण्याचे ठरवले. त्यासाठी एमएमआरडीएने आवश्यक ते सर्व सुटे भाग तयार करुन ही मोनेरेल दुरुस्त केली आहे. त्यांनतर एमएमआरडीएच्या प्रयत्नांनी आरएसटी-5 ही आता संपूर्ण भारतीय बनावटीची मोनोरेल ठरली आहे. ही रेल्वे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी तशी माहिती दिली.

दरम्यान, रेल्वे बोर्डानं प्रवाशांसाठी CSMT आणि कल्याणदरम्यान 10 एसी लोकल (AC Local) ट्रेन चालवण्यास मान्यता दिलीय. केंद्रीय रेल्वे(CR) ने 17 डिसेंबर 2020 पासून या मार्गावर 10 एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  (The RST-5 monorail is now back for service)

संबंधित बातमी :

CSMT ते कल्याणदरम्यान 10 एसी लोकल धावणार, मुंबईकरांना दिलासा

माझा पराभव माझ्या कुटुंबाला घेऊन संपला असता, आई-वडिलांचं राजकीय भविष्यही पणाला लागलेलं : सुजय विखे पाटील

हे पाकिस्तान नाही, हा महाराष्ट्र आहे, इथे कायद्याचं राज्य, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

(The RST-5 monorail is now back for service)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.