Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा दुसरा टप्पा, 1, 2 ऑगस्टला सिंधुदुर्ग, कोल्हापुरात, पुण्यात जाणार

सिंधुदुर्गातल्या कुडाळ, वेंगुर्ला (Vengurla) सावंतवाडी आणि कोल्हापूर शहर, शिरोळ ते कात्रज चौक दरम्यान 1 आणि 2 ऑगस्ट रोजी ही शिव संवाद यात्रा निघणार आहे.

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा दुसरा टप्पा, 1, 2 ऑगस्टला सिंधुदुर्ग, कोल्हापुरात, पुण्यात जाणार
आ. आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 5:50 PM

मुंबई : राज्यातील शिवसेनेत मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे गटात मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते गेलेत. त्यामुळं शिवसेनचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत. त्यांना शिवसैनिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पहिला टप्पा आटोपला. आता आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करत आहेत. 1 व 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग (सावंतवाडी/कुडाळ), कोल्हापूर (शिरोळ), सातारा (पाटण) आणि पुण्यात कात्रज येथे शिव संवाद यात्रा निघणार निघणार आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते, युवासेना (Yuva Sena) प्रमुख, माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा दुसरा टप्पा येत्या 1 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. सिंधुदुर्गातल्या कुडाळ, वेंगुर्ला (Vengurla) सावंतवाडी आणि कोल्हापूर शहर, शिरोळ ते कात्रज चौक दरम्यान 1 आणि 2 ऑगस्ट रोजी ही शिव संवाद यात्रा निघणार आहे.

शिव संवाद यात्रेचा दुसरा टप्पा

पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य एक ऑगस्टला सिधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याकरीता दौऱ्यावर जाणार आहेत. सोमवारी, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता कुडाळ येथे शिवसंवाद यात्रा होईल. दुपारी 12:30 वाजता सावंतवाडी येथे मेळावा होणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता कोल्हापूर शहर येथे मेळावा होईल. दोन ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर येथून शिरोळकडे रवाना होणार आहेत. दुपारी 12 वाजता शिरोळ येथे शिव संवाद यात्रा होईल. दुपारी 3:15 वाजता पाटण येथे शिव संवाद करतील. त्यानंतर सायंकाळी 6:45 कात्रज येथे शिव संवाद होईल. शिर्डी येथील आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी दिव्यांग शिवसैनिकाची भेट घेतली. आदित्य ठाकरे शिवसेनेतून बाहेर गेलेल्या आमदारांवर टिकास्त्र सोडत आहेत. त्यातल्या त्यात मूळ शिवसैनिकांना ठाकरे गटात टिकून राहण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यातून काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल होत आहे. शिवसैनिकांना पुन्हा उभारी मिळत आहे. तुटलेली सेना जोडण्यात किती यश येते हे या दौऱ्यानंतर समजणार आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.