Cold : नववर्षाचा पहिला आठवडा थंडीचा; गारपीट, पावसाची शक्यता नसल्याची हवामान खात्याची खूशखबर

सध्या देशभर कुठे जोरदार थंडी, तर कुठे अवकाळी पाऊस असे संमिश्र वातावरण आहे. तामिळनाडू तसेच आसपासच्या भागांत पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा वा गारपीटीचा त्रास झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही राज्यांत गारवा आहे.

Cold : नववर्षाचा पहिला आठवडा थंडीचा; गारपीट, पावसाची शक्यता नसल्याची हवामान खात्याची खूशखबर
नववर्षाचा पहिला आठवडा थंडीचा
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 10:54 PM

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात महाराष्ट्रातील जनतेला सुखद गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. पुढील आठवडाभर राज्यात गारपीट किंवा पाऊस पडण्याची शक्यता नाही, तर गुलाबी थंडी मुक्कामी असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. उर्वरित राज्याप्रमाणेच मुंबई शहर व उपनगरांच्या किमान तापमानातही मोठी घट होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

देशभर वातावरणाची स्थिती काय?

सध्या देशभर कुठे जोरदार थंडी, तर कुठे अवकाळी पाऊस असे संमिश्र वातावरण आहे. तामिळनाडू तसेच आसपासच्या भागांत पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा वा गारपीटीचा त्रास झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही राज्यांत गारवा आहे. वायव्य तसेच उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीचा कहर सुरू आहे. गुजरात, मध्य प्रदेश राज्यात पुढील आठवड्यात किमान तापमानात घट होऊन तेथेही कडाक्याची थंडी जाणवेल. तसेच संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट व दाट धुके असेल, असेही हवामान खात्याने नमूद केले आहे.

पिकांसाठी पोषक वातावरण

पुढील आठवडाभर संपूर्ण महाराष्ट्रात गारवा अनुभवायला मिळणार आहे. 6 जानेवारीपर्यंत ही परिस्थिती असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. राज्यात केवळ थंडीच राहणार आहे. थंडीमुळे पिकांसाठी पोषक वातावरण राहणार असल्याने शेतकरी आनंदात आहेत. या वातावरणाचा रब्बी पिके आणि उन्हाळ (गावठी) पेर व कांद्याच्या पिकांना फायदा होत आहे. उन्हाळ कांदा लागवडीला वातावरणाचा कोणताही अडथळा जाणवणार नसल्याचे बोलले जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरांत पुढील आठवड्यात किमान तापमान 13 ते 14 अंशांपर्यंत आणि कमाल तापमान 26 ते 27 अंशांपर्यंत घट होणार आहे. (The state will remain cold for the next week, the weather department forecast)

इतर बातम्या

Mhada | तुमचाही पुनर्विकास प्रकल्प रखडलाय? टेन्शन विसरा, म्हाडानं घेतला मोठा निर्णय!

Breaking : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.