AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार, आरटीपीसीआरसह सर्व उपाययोजनांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक

ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी सभापती यांनी दिल्या. सोमवार, दिनांक 20 डिसेंबर रोजी एकूण 2678 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 8 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Mumbai | विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार, आरटीपीसीआरसह सर्व उपाययोजनांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक
विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 3:40 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, 22 डिसेंबरपासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज अधिवेशन संदर्भातील आरटीपीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांचा उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला.

ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी सभापती यांनी दिल्या. सोमवार, 20 डिसेंबर रोजी एकूण 2678 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 8 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटीपीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी बंधनकारक आहे.

अधिवेशन कालावधीत अभ्यागतांना प्रवेश नाही

अधिवेशन कालावधीत गर्दी होऊन संसर्ग वाढू नये यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नसून स्वीय सहायकांसाठी बसण्याची व्यवस्था विधान भवनासमोरील वाहनतळ आवारात स्वतंत्र मंडप टाकून करण्यात आली आहे. मंत्री महोदयांच्या आस्थानपनेवरील कर्मचारी यांना देखील अत्यंत मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येत आहे.

विधानसभा, विधानपरिषद व मध्यवर्ती सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा कार्यरत

विधानसभा सभागृहामध्ये सुयोग्य अंतर राखण्याच्या दृष्टीने अधिवेशन कालावधीमध्ये सन्माननीय सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था एक आसन सोडून करण्यात आली असून गतवर्षीप्रमाणेच सभागृहाच्या गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानपरिषद सभागृहामध्ये आसन व्यवस्था पुरेशी असल्यामुळे सन्माननीय सदस्यांची बसण्याची व्यवस्था सभागृहामध्येच करण्यात आली आहे. विधानसभा, विधानपरिषद व मध्यवर्ती सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव (समिती) डॉ. अनिल महाजन, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव रविंद्र जगदाळे, पोलीस दल, वैद्यकीय विभाग, अग्निशमन यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (The winter session of the Legislative Assembly will begin tomorrow)

इतर बातम्या

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, सत्ताधाऱ्यांना कोणत्या प्रश्नांवर घेरणार?; फडणवीसांनी सांगितले 8 मुद्दे

Badshah Malik | देशातील सर्वात मोठा रक्तचंदन तस्कर जाळ्यात, बादशाह मलिक मुंबईत जेरबंद

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.