भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वेगवान गाडीबाहेर लटकन दारु पिणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता.

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 11:52 AM

मुंबई : भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान करणाऱ्या स्टंटबाजांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाकोला वाहतूक पोलिसांच्या तक्रारीनंतर ओंगळवाणं प्रदर्शन करणाऱ्या तरुणांबाबत विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. (Three Mumbai youths arrested for dangerous stunts in speeding car while consuming liquor)

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वेगवान गाडीबाहेर लटकन दारु पिणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. मागील खिडकीच्या काचा खाली करुन त्यावर बसत दोन युवक मद्यपान करत असल्याचं यामध्ये दिसत होतं. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करुन त्यांच्या अटकेची मागणी केली जात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डिसेंबरला मध्यरात्री जवळपास एक वाजून 25 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सहारा उड्डाणपुलाजवळ MH 47 AB 6622 या कारमधून धावत्या गाडीच्या दरवाजाबाहेर लटकून मद्यपान करणाऱ्या युवकांचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला होता.

पोलिसांनी तक्रार दाखल करुन कार चालक अनिरुद्ध जगदाळे आणि त्याचे मित्र अरबाज सय्यद आणि दीपक सिकरिया यांना अटक केली. पोलिसांनी जगदाळेची कारही जप्त केली आहे. विलेपार्ले पोलिसांनी कलम 279, 336, 34 अंतर्गत कारवाई केली.

(Three Mumbai youths arrested for dangerous stunts in speeding car while consuming liquor)

स्टंटबाजांची मुंबई

मुंबई लोकल असो किंवा उत्तुंग इमारती, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्टंटबाजांची कमतरता नाही. कोणी आत्मानंदासाठी असे स्टंट करतं, तर कोणी फेसबुक, टिकटॉक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर झळकण्यासाठी. लाईक्स आणि वाहवा मिळवण्याच्या नशेतून ही स्टंटबाजी फोफावली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कारवाई करु शकतात, मात्र या मानसिकतेवर इलाज सापडलेला नाही.

मुंबई लोकलमध्ये दरवाजात लटकून स्टंट करणारे कमी नाहीत. कधी लोकलमधील सहप्रवाशांनी त्यांना सुनावलं, तर कधी मार्गालगतच्या विजेच्या खांबांचा प्रसाद त्यांना खावा लागला. अनेकांना प्राणाला मुकावं लागल्यानंतरच ही स्टंटबाजी थांबली.

उंच इमारतीच्या धोकादायक भागावर स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. इमारतीच्या पॅराफीटवर दोन्ही हातांवर उभं राहून हा तरुण हँडस्टँड करत होता. व्हिडीओमध्ये आजूबाजूचा परिसर दिसल्याने ही गगनचुंबी इमारत असल्याचं समजलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या :

जीव धोक्यात घालून स्टंटबाजी; पोलिसांनी तिन्ही तरुणांच्या मुसक्या आवळल्या

फेसबुक लाईव्ह करत बाईकवर स्टंटबाजी, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

(Three Mumbai youths arrested for dangerous stunts in speeding car while consuming liquor)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.