मुंबईत आज 393 कोरोना रुग्णांची भर, एकूण आकडा 6 हजार 169 वर
देशातील कोरोना संसर्गाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे (Total corona patient in Mumbai ).
मुंबई : देशातील कोरोना संसर्गाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे (Total corona patient in Mumbai ). आज (28 एप्रिल) मुंबईत 393 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 169 वर पोहचली आहे. आज दिवसभरात 25 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या 244 झाली आहे.
उपचारानंतर बरे झालेल्या 219 कोरोना रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 1 हजार 234 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईला कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. मुंबईतील झोपडपट्टी परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आज मुंबईतील विक्रोळी टागोर नगर परिसरात 8 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. विक्रोळी परिसरातील वीटी बेकरी परिसरात हे रुग्ण सापडले आहेत. यामुळे 60 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
नवी मुंबई, पालघर, वसई विरारला कोरोनाचा विळखा
मुंबई व्यतिरिक्त आजूबाजूच्या नवी मुंबई, वसई-विरार, पालघर, कल्याण डोंबिवली या ठिकाणीही नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. नवी मुंबईच्या एपीएमसीतील धान्य मार्केटमधील व्यापाराला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यापाऱ्याचे दुकान धान्य मार्केटमधील G विंगमध्ये होते. त्यामुळे पालिकेने G विंग सील केलं आहे.
पालघर जिल्ह्यात एकाच दिवशी 3 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. हे तिघेही बोईसरमधील दलाल टॉवर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात होते. या तिघांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पालघरमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 41 झाली आहे. वसई विरारमध्ये एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे वसई विरार कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 123 वर पोहोचली आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कल्याण डोंबिवली परिसरात आज नवे 6 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कल्याण डोबिंवलीतील कोरोनाबाधितांची संख्या 153 वर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :
भिवंडी मनपा कम्युनिटी किचनमध्ये तांदळाची वानवा, 6 हजार कामगार दुपारी उपाशीच
मालेगावात दिवसभरात तब्बल 48 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 171 वर
Total corona patient in Mumbai