मोठी बातमी: मुंबईतील दुकानं बंद ठेवणार नाही; ठाकरे सरकारच्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचे बंड

राज्यात एकूण 13 लाख दुकाने आहेत. यापैकी 4 लाख दुकाने मुंबईत आहेत. | Weekend lockdown shops

मोठी बातमी: मुंबईतील दुकानं बंद ठेवणार नाही; ठाकरे सरकारच्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचे बंड
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 8:28 AM

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचा (Lockdown) आदेश काढणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात (Thackeray govt) राज्यातील व्यापारी संघटनेने बंडाचे निशाण फडकावले आहे. मुंबई शॉप रिटेल असोसिएशनने राज्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. (Traders Association refuse to close down shops in Mumbai during Weekend Lockdown period)

दुकाने बंद राहिली तर माल सडेल. त्याची भरपाई कोण देणार? जागेचं भाडं आणि कामगारांचे पगार कोण देणार, असा सवाल फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी उपस्थित केला आहे. राज्यात एकूण 13 लाख दुकाने आहेत. यापैकी 4 लाख दुकाने मुंबईत आहेत. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांची संख्या अवघी 35 हजार इतकी आहे. त्यामुळे इतर दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे विरेन शहा यांनी म्हटले. त्यामुळे आता ठाकरे सरकार व्यापाऱ्यांची समजूत कशाप्रकारे काढणार, हे पाहावे लागेल.

वीकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापारी, पत्रकार, वृत्तसंस्था, चित्रपट आणि थिएटर मालक अशा अनेक घटकांशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सध्या आर्थिक चक्र सुरु राहण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवणे महत्त्वाचे असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला सर्व घटकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तसचे मनसे आणि भाजप या विरोधी पक्षांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन

महाराष्ट्रात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. तर दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू राहील. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे, मात्र त्याविषयी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. वीकेंड लॉकडाऊनच्या वेळी ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन पार्सल नेता येणार नाही, मात्र होम डिलीव्हरीचा पर्याय उपलब्ध असेल.

काय काय बंद राहणार?

राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Weekend Lockdown | सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी महत्त्वाचे नियम

(Traders Association refuse to close down shops in Mumbai during Weekend Lockdown period)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.