Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TRP Scam : एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक, Republic TV च्या अधिकाऱ्यांची उद्या चौकशी

टीआरपी घोटाळा प्रकरणात आज आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली. विनय त्रिपाठी असे आरोपीचे नाव असून तो हंसा रिसर्च प्रा. लि. या कंपनीचा माजी कर्मचारी आहे.

TRP Scam : एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक, Republic TV च्या अधिकाऱ्यांची उद्या चौकशी
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 10:29 PM

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणात आज आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली. विनय त्रिपाठी असे आरोपीचे नाव असून तो हंसा रिसर्च प्रा. लि. या कंपनीचा माजी कर्मचारी आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. तर उद्या रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या अनेक अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. तसेच दोन चॅनेल्सची बँक खाती आज पोलिसांनी सील केली आहेत. (TRP scam : one accused arrested in UP, Republic TV Channel officials questioned tomorrow)

चॅनेलच्या टीआरपी घोटाळा प्रकरणात आज महत्त्वाचा असलेला आरोपी विनय त्रिपाठी याला अटक करण्यात आली. विनय हा हंसा रिसर्च प्रा. लि. या कंपनीत पूर्वी रिलेशन मॅनेजर होता. टीआरपी घोटाळा प्रकरणात आधीच विशाल भंडारी याला अटक करण्यात आली आहे. विनय हा विशाल भंडारी याचा वरिष्ठ होता. विशाल हा ग्राहकांना अमुक एक चॅनेल पाहण्यासाठी पैसे देत होता, असा पोलिसांना संशय आहे. यामुळे त्याला आज अटक करण्यात आली.

विनय हा 2018 पर्यंत हंसा कंपनीत काम करत होता. मात्र, तो बरोमीटरमध्ये फेरफार करत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. जून महिन्यात विनय हा उतर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्हयातील त्याच्या गावी निघून गेला होता. त्याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस तिथे पोहचले आणि त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने विनयला अटक केली.

दरम्यान, टीआरपी घोटाळ्यात आज मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी अनेक मुद्यांवर तपास केला. हंसा रिसर्च कंपनीचे सीईओ प्रवीण निझार यांचा सुमारे सहा तास जबाब नोंदवला. त्यांच्याकडून बरोमीटरबाबत चौकशी करण्यात आली. तर हंसा कंपनीचे डेप्युटी मॅनेजर आणि तक्रारदार यांचा आज सविस्तर पुरवणी जबाब नोंदवण्यात आला. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी आज फक्त मराठी आणि फॉक्स चॅनेल या दोन चॅनेलची बँक खाती गोठवली. या चॅनेलच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये आहेत.

मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आता फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या चॅनेलवर टीआरपी घोटाळा केल्याचा आरोप आहे त्या चॅनेलचे मागील तीन वर्षाचे हिशेब तपासले जाणार आहेत. त्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्यासाठी पोलिसांनी टेंडर काढलं आहे. काही चॅनेलमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून मनी लाँडरींग होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

रिपब्लिक चॅनेलचे सीईओ शिवा सुब्रह्मण्यम यांना चौकशी करण्यासाठी बोलावलं आहे. शिवा यांनी आपल्या कुटुंबातील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर एकात कोरोनाची लक्षण आहेत, असे कळवले आहे. यानंतरही त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

BARC Fake TRP Racket | अडाणी लोकांच्या घरातही इंग्रजी चॅनल, ‘रिपब्लिक’कडून TRP चा खेळ, दोन मालकांना अटक : मुंबई पोलीस

मुंबई पोलिसांनी हात आखडले, TRP घोटाळ्याचा तपास खास यंत्रणेकडे

फेक टीआरपी म्हणजे काय? असा चालतो आकड्यांचा खेळ

TRP SCAM: रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून सीईओ विकास खानचंदानींच्या चौकशीला सुरुवात

(TRP scam : one accused arrested in UP, Republic TV Channel officials questioned tomorrow)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.