AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Truck driver Strike update | ट्रक, टँकर चालकांचा संप मिटला, पण… आज मुंबईवर काय परिणाम? जाणून घ्या

Truck driver Strike update | ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेला बेमुदत संप कालरात्री सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेतला. पण अजूनही सर्वकाही सुरळीत झालेलं नाही. मुंबईत काय परिस्थिती आहे? मुंबईत आज काय परिणाम जाणवणार? त्या बद्दल जाणून घ्या.

Truck driver Strike update | ट्रक, टँकर चालकांचा संप मिटला, पण... आज मुंबईवर काय परिणाम? जाणून घ्या
Truck driver Strike update
| Updated on: Jan 03, 2024 | 7:46 AM
Share

Truck driver Strike Update | ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रक चालक पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार असल्य़ाची बातमी आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण कालपासून संपूर्ण देशभरात या संपाच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली होती. मुंबईतील सर्वच पेट्रोल पंपांवर मंगळवारी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूकीला समस्या येत होत्या. संपूर्ण मुंबापुरीत हेच चित्र होतं. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल मिळणार नाही, हे लक्षात येताच मोटरचालकांनी लगेच टाकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळवला. परिणामी काही पेट्रोल पंपावर इंधन काही तासात आऊट ऑफ स्टॉक झालं.

रात्री केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये यशस्वी चर्चा झाली. हिट अँड रन कायदा लागू झालेला नाहीय, असं स्पष्ट केल्यानंतर संप माघारीचा निर्णय झाला. हिट अँड रन कायद्यातील तरतुदीमुळे ट्रक आणि टँकर चालकांनी बेमुदत संप पुकारला होता. आतापर्यंत कायद्यात हिट अँड रन केसमध्ये 2 वर्ष शिक्षेची तरतूद होती. जामिन मिळून जायचा. पण आता कायद्यात बदल करण्यात आलाय. आता 10 वर्ष तुरुंगवास आणि 7 लाख रुपयापर्यंत दंड लागू शकतो. हा कायदा दुचाकीपासून कार, ट्रक, टँकर सर्व प्रकारच्या वाहनचालकांना लागू होतो. त्यामुळे ट्रक चालक संपावर गेले होते.

संप मागे घेतल्यानंतर मुंबईत काय स्थिती?

ट्रक, टँकर चालकांनी संप मागे घेतला, ही चांगली बाब आहे. पण लगेच सर्व सुरळीत झालेलं नाही. दादरच्या फळभाजी मार्केटमध्ये नेहमीसारखे भाज्यांचे ट्रक आलेले नाहीत. एरवी दादर मार्केटमध्ये सकाळच्यावेळी प्रचंड गर्दी असते. फळभाज्यांचे ट्रक मोठ्या प्रमाणात आलेले असतात. पण आज ट्रक कमी संख्येने आले. भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी मुंबईकरांना आज महागड्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागू शकतो. नागपूरमध्ये काही पेट्रोल पंपांवर अजूनही ठणठणाट आहे. नागरिक पट्रोल, डिझेल भरण्यासाठी येत आहेत. पण टँकर पोहोचले नसल्यामुळे त्यांना माघारी फिराव लागत आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.