टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | महाराष्ट्रात अवकाळी अन् मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांपेक्षा अयोध्या दौऱ्याला प्राधान्य…
नुकसानग्रस्त शेतीची अयोध्या दौऱ्यावरुन परतताच, मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी दौरा सुरु केला. मात्र शेतकऱ्यांपेक्षा अयोध्या दौऱ्याला प्राधान्य देत असल्याची टीका विरोधकांनी केलीय.
मुंबई : नुकसानग्रस्त शेतीची अयोध्या दौऱ्यावरुन परतताच, मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी दौरा सुरु केला. मात्र शेतकऱ्यांपेक्षा अयोध्या दौऱ्याला प्राधान्य देत असल्याची टीका विरोधकांनी केलीय.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं, पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणलेत. शेतात गारांचा खच पडला आणि पिकं उद्धवस्त झालीत. गहू, कांदा, द्राक्ष, आंबा आणि भाजीपाला वाया गेलाय. सरकार अयोध्येत होतं. त्याच काळात महाराष्ट्रात अवकाळीनं तांडव केला. मात्र अयोध्येहून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
महिन्याभराआधीही अशाच अवकाळीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झालं. दरम्यानच्या काळात अधिवेशन झालं. पण अद्याप नुकसान भरपाई जाहीर झाली नाही. आणि आता पुन्हा होतं नव्हतं ते पिकही भूईसपाट झालंय. अयोध्या दौऱ्यावरुन येताच, शिंदे नाशिक जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर आले. पण विरोधकांनी शिंदेंच्या प्राधान्य क्रमावरुन समाचार घेतला.
पुन्हा एकदा पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. हे सोपस्कार पूर्ण होईलही. पण मदत कशी लवकर शेतकऱ्याच्या खात्यात पडेल, यावर लक्ष दिलं पाहिजे.