AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘टीव्ही 9 मराठी’च्या 2 प्रतिनिधींची TVJA च्या महत्त्वाच्या पदावर निवड

TVJA च्या कार्यकारणीवर टीव्ही 9 मराठीच्या दोन प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. (TV 9 Marathi Two journalist selection for important post In TVJA Election)

'टीव्ही 9 मराठी'च्या 2 प्रतिनिधींची TVJA च्या महत्त्वाच्या पदावर निवड
| Updated on: Nov 09, 2020 | 2:39 PM
Share

मुंबई : टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन या संस्थेची द्विवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत TVJA च्या कार्यकारणीवर ‘टीव्ही 9 मराठी’च्या दोन प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. टीव्ही 9 मराठीचे वरिष्ठ बातमीदार अक्षय कुडकेलवार यांची सहसचिवपदी, तर वरिष्ठ कॅमेरामॅन कल्पेश हडकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. (TV 9 Marathi Two journalist selection for important post In TVJA Election)

गेल्या अनेक वर्षापासून टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन (टीव्हीजेए) ही संस्था मुंबई आणि महाराष्ट्रातील टीव्ही पत्रकारांच्या हितासाठी काम करते. दोन दिवसांपूर्वी या संस्थेची द्विवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत टीव्हीजेएच्या कार्यकारणीवर टीव्ही 9 मराठीच्या दोन सहकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

यात वरिष्ठ कॅमेरामन कल्पेश हडकर हे उपाध्यक्षपदी निवडून आले. तर वरिष्ठ बातमीदार अक्षय कुडकेलवार यांची टीव्हीजेएच्या सहसचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. कल्पेश हडकर हे गेल्या समितीत खजिनदार म्हणून काम पाहत होते.

टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन ही संस्था पत्रकारांसाठी वैद्यकीय शिबीर, मानसिक ताण कमी करण्यासाठी, योगा शिबीर यासोबतच गृहनिर्माण प्रकल्पासारख्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी टीव्हीजेए आणि सर्व नवनियुक्त सदस्य बांधील असणार आहे.

दरम्यान या संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात पत्रकारांसाठी दोन वेळा निशुल्क कोरोना चाचणी राबवण्यात आली होती. त्यासोबत कोरोना काळात नोकरी गेलेल्या बहुतांश सहकाऱ्यांना टीव्हीजेए संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात आली.

TVJA संपूर्ण कार्यकारणी समिती?

अध्यक्ष – विनोद जगदाळे उपाध्यक्ष – कल्पेश हडकर सचिव – राजेश माळकर सहसचिव – अक्षय कुडकेलवार (बिनविरोध) कोषाध्यक्ष – राजिव रंजन

?सदस्य?

समीर शेळके राजू रेवनकर सुरेश साहिल अजित शिवतरकर संतोष पानवलकर संदीप पाटील राजू सोनावणे सर्वेश तिवारी मनश्री पाठक उर्वशी खोना (TV 9 Marathi Two journalist selection for important post In TVJA Election)

संबंधित बातम्या : 

मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण, वैद्यकीय सूत्रांची माहिती

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.