AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maha-Infra Conclave: हित महाराष्ट्राचं!, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल?; ‘टीव्ही9 मराठीची आज कॉनक्लेव्ह’

भविष्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? याचा उद्या मंगळवारी उलगडा होणार आहे. राज्यातील आघाडीची न्यूज वाहिनी 'टीव्ही9 मराठी'ने उद्या मंगळवारी 'महा-इन्फ्रा कॉन्क्लेव्ह'चे (Maha-Infra Conclave) आयोजन केलं आहे.

Maha-Infra Conclave: हित महाराष्ट्राचं!, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल?; 'टीव्ही9 मराठीची आज कॉनक्लेव्ह'
हित महाराष्ट्राचं!, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल?; 'टीव्ही9 मराठीची उद्या कॉनक्लेव्ह'
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 10:29 AM

मुंबई: भविष्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? याचा उद्या मंगळवारी उलगडा होणार आहे. राज्यातील आघाडीची न्यूज वाहिनी ‘टीव्ही9 मराठी’ने आज ‘महा-इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चे (Maha-Infra Conclave) आयोजन केलं आहे. या महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (subhash desai) आणि पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. पायाभूत सुविधा विकास प्रकल्प राज्यातील उद्योग आणि पर्यटन क्षेत्राच्या वाढीला कशा प्रकारे चालना देतील याविषयीचा रोडमॅपच हे दोन्ही नेते मांडणार आहेत.  22 फेब्रुवारी 2022 रोजी टीव्ही 9 मराठी आणि टीव्ही9 मराठीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉन्क्लेव्हचे दिवसभर प्रसारण केले जाणार आहे.

राज्यातील भविष्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीवर लक्ष केंद्रीत करून महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे. राज्याच्या आर्थिक वृद्धितील पायाभूत सुविधांची भूमिका या कॉन्क्लेव्हमधून अधोरेखित करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील पायाभूत सुविधांच्या स्थितीवरही या परिषदेतून प्रकाश टाकण्यात येणार आहे. या क्षेत्रातून विकास कसा साधता येईल आणि राष्ट्र निर्मितीत त्याची कशी मदत होईल यावरही या परिषदेत ऊहापोह होणार आहे.

विविध विषयांवर मंथन

राज्याचे अर्थमंत्री, धोरण राबवणारे नेते, महाराष्ट्र इंक चॅम्पियन्स आदी टीव्ही9 मराठीच्या महा-इन्फ्रा कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. पायाभूत सुविधांचा लाभ घेणाऱ्या औद्योगिक राज्यासाठी अतुलनीय नेतृत्व कसे तयार करावे यावर या कॉन्क्लेव्हमध्ये मंथन करण्यात येणार आहे. मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सच्या धोरणाने राज्यासाठी अनेक संधी खुल्या केल्या आहेत. धोरण ठरवणारे आणि खासगी क्षेत्रातील उद्योजकांना अंमलबजावणी करण्यासाठीचा अजेंडा तयार करण्यासाठी ही कॉन्क्लेव्ह एक व्यासपीठ निर्माण करून देणार आहे. तसेच या प्लॅटफॉर्मवरून प्रचंड प्रचंड पायाभूत-विकास प्रकल्पांचे सकारात्मक परिणाम स्पष्ट करेल. आणि हा प्रकल्प महाराष्ट्रातील जनतेच्या पथ्यावर पडेल.

या कॉन्क्लेव्हमध्ये एमएमआर क्षेत्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांवर पुढील सत्रे असतील.

जागतिक दर्जाचा MMR:

एमएमआर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे: मुंबई मेट्रो, मुंबई कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि इतर अनेक मेगा प्रकल्पांसह, एमएमआर क्षेत्रात केवळ दळणवळणाची साधनेच वाढवणार नाही, तर नागरिकांच्या प्रवास करण्याच्या पद्धतीतही बदल करण्यात येणार आहे. शहरात आणि शहरातील इतर विविध महत्त्वाच्या नोड्समध्ये प्रवाशांनी प्रवास करावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कनेक्टिंग महाराष्ट्र:

पायाभूत सुविधांद्वारे ग्रामीण भागांना शहरांशी जोडणे: मुंबई-नागपूर समृद्धी कॉरिडॉर सारखे मोठे प्रकल्प शहरी भागांना ग्रामीण भागाशी जोडण्याबरोबरच उद्योग, पर्यटन आणि रोजगार निर्मितीसाठी विकासाची द्वारे उघडी करणार आहे.

‘हित’ महाराष्ट्राचं:

विविध क्षेत्रातील विकासावर पायाभूत सुविधांच्या वाढीचा प्रभाव: संपूर्ण शहरात होणारे अनेक रस्ते, रेल्वे आणि सागरी वाहतूक प्रकल्प लक्षात घेता, या कॉन्क्लेव्हमध्ये विविध सरकारी आणि खासगी भागधारकांना एकाच मंचावर एकत्र आणणार आहे. या प्रकल्पांचे महत्त्व, काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचा कालावधी आणि ते कधी पूर्ण होईल आणि त्याचा सार्वजनिकरित्या कधीपासून उपयोग करता येईल, यावर प्रकाश टाकण्यासाठी हे भागधारक एकत्र येतील.

कार्यक्रम कधी?

आज मंगळवारी 22 फेब्रुवारी 2022 रोजी ‘महा-इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटन कुणाच्या हस्ते?

राज्याचे नगरविकास मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कॉन्क्लेव्हचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

कार्यक्रम कुठे पाहाल?

‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनी आणि ‘टीव्ही9 मराठी’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉन्क्लेव्हचे दिवसभर प्रसारण केले जाणार आहे.

कोणते मंत्री संबोधित करणार

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे या कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत.

कोण कोण सहभागी होणार

  1. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास
  2. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैस्कर
  3. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे
  4. एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार
  5. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी
  6. एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अनबलगन
  7. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी
  8. एमएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल
  9. पीएमआरडीएचे एमडी सुहास दिवसे
  10. पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर

संबंधित बातम्या:

कमाईची संधी घालवू नका… ‘या’ सहा मोठ्या कंपन्यांचे IPO होणार लाँच

SHARE MARKET UPDATE: घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 150 अंकांनी गडगडला; गुंतवणुकदारांत अनिश्चितता

Maharashtra News Live Update : फडणवीसांना नैराश्य आलंय, जास्त लक्ष देऊ नका-आदित्य ठाकरे

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.