राज ठाकरेंनी भाजपची स्कीप्ट वाचली म्हणत उद्धव ठाकरे यांची अनधिकृत मजारहीबाबत व्यक्त केली शंका!
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीवरुन राज ठाकरेंनी इशारा दिला आणि तात्काळ सरकारनं बांधकाम सपाट केलं आता त्यावरुन उद्धव ठाकरेंनी टोलाही लगावला तर मेळाव्यातल्या भाषणावरुन केमिकल लोच्या झाल्याचीही टीका केली.
मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीवरुन राज ठाकरेंनी इशारा दिला आणि तात्काळ सरकारनं बांधकाम सपाट केलं आता त्यावरुन उद्धव ठाकरेंनी टोलाही लगावला तर मेळाव्यातल्या भाषणावरुन केमिकल लोच्या झाल्याचीही टीका केली.
राज ठाकरेंनी माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीवरुन सरकारला इशारा दिला आणि पुढच्या काही तासांतच मजार हटवण्याचे आदेश निघाले सकाळी जेसीबी मजारीच्या ठिकाणी पोहोचली अनधिकृत मजारही हटवली आणि हिरवा झेंडाही खाली उतरवला पण राज ठाकरेंनी अनिधकृत मजारीवरुन दिलेला इशारा आणि सरकारची कारवाई, यावरुन उद्धव ठाकरेंनी शंका उपस्थित केलीय. राज ठाकरेंनी भाजपची स्कीप्ट वाचल्याचं म्हणत, पत्रावरुनही टोला लगावला.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंच्या निशाण्यावर उद्धव ठाकरेच होते. उद्धव ठाकरेंचेच मला शिवसेनेतून बाहेर काढण्याचे प्रयत्न होते. पण बाळासाहेबांनंतर त्यांनाही शिवधनुष्य पेललं नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली पण 18 वर्षांपासून एकच रेकॉर्डिंग सुरु असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवलीय.
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना, वांद्यातल्या सभेतील टीकेची आठवण करुन दिलीय त्यासभेत मुन्नाभाई चित्रपटाचा आधार घेत, राज ठाकरेंचा केमिकल लोच्या झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे तर राज ठाकरे अनधिकृत मजारीवर बोलल्या बोलल्या झालेली कारवाई म्हणजे मिलीभगत असून उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंना मोठं करण्याचा भाजप आणि शिंदेंचा प्रयत्न असल्याचं इम्तियाज जलील म्हणालेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी शिंदे-फडणवीसांबरोबरच राज ठाकरेंचं अभिनंदन केलंय.
माहीमच्या समुद्रातील,अनधिकृत बांधकाम हटवण्याचं काम पूर्ण झालंय आणि आता श्रेयवादही सुरु झाल्याचं दिसतंय. मनसेचा इम्पॅक्ट म्हणत पोस्टरबाजीही सुरु झालीय.