Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | ठाकरेंसोबत सभेच्या मंचावर, रश्मी ठाकरेंकडून संकेत, पाहा व्हिडीओ
Tv9 Marathi Special Report : नाशिकमधील सभेत भास्कर जाधव यांनी रश्मी ठाकरे या माँसारख्या लढाऊ असल्याचं म्हटलं होतं. रश्मी ठाकरेंना त्यांनी तुम्हीही आता बाहेर पडा अशी विनंती केली होती. मात्र रश्मी ठाकरेंनी या सभेतूनत संकेत दिले आहेत. पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : ऐरव्ही मंचासमोर किंवा कार्यकर्त्यांसोबत बसणाऱ्या रश्मी ठाकरे काल उद्धव ठाकरेंसोबत मंचावर होत्या. त्यामुळं रश्मी ठाकरेही आता सक्रीय राजकारणात सहभागी होणार का ? अशी चर्चा सुरु झाली. ही दृश्यं फार बोलकी आणि ठाकरे गटातल्या भविष्यातल्या राजकीय वाटचालींवरुन विचार करायला लावणारी आहेत.
पाहा व्हिडीओ- :
रश्मी ठाकरे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसोबत अशाप्रकारे सभेतल्या स्टेजवर एकत्र आल्यात. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंच्या शेजारीच रश्मी ठाकरे बसल्या. त्यामुळं रश्मी ठाकरे आता उघडपणे सक्रीत राजकारणात येणार आहेत की काय? अशी चर्चा सुरु झालीय.
भास्कर जाधवांचं भाषण सुरु असताना रश्मी ठाकरे सभा स्थळी आल्या. त्यानंतर भास्कर जाधवांनी रश्मी ठाकरेंना तुम्हीही आता बाहेर पडा, अशी विनंती केली. विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी रश्मी वहिनी बाहेर पडा, असं भास्कर जाधव म्हणाले आण त्यानंतर रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत स्टेजवर एकत्र बसल्यात.
ठाकरे गटातील निलम गोऱ्हे, मनिषा कायंदेसारख्या महिला नेत्या शिंदेंच्या शिवसेनेत आल्यात. त्यामुळं ठाकरे गटातील महिला ब्रिगेड काहीशी कमी झालीच आहे. तीच कमी दूर करण्यासाठी रश्मी ठाकरे दूर करणार का, अशी खलबतं राजकीय वर्तुळातही आहेच. ठाकरे गटाचा कोणताही कार्यक्रम असो. रश्मी ठाकरे उपस्थित असतातच महिला मोर्चाच्या कार्यक्रमातही त्या दिसतातच. मात्र प्रत्यक्ष सभेच्या स्टेजवर त्या पहिल्यांदाच आल्यात.
भास्कर जाधव यांची भावनिक साद
उद्धव ठाकरे यांना आवडणार नाही पण आज मी रश्मी ठाकरेंवर भाषण करणार आहे. गेले अनेक दिवस आपल्या माणसांवर अन्याय होत आहे. मात्र या सगळ्यात रश्मी ठाकरे या जराही डगमगल्या नाहीत ना त्यांचा तोल ढळला नाही. याआधी शिवसेनेच्या सभांमध्ये व्यासपीठावर एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपाने धगधगतं अग्निकुंड असायचं तर दुसऱ्या बाजूला चंद्राप्रमाणे शांत माँसाहेब बसलेल्या असायच्या. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं, आदित्य ठाकरेंवर आरोप झाले तरीही मी त्यांना डगमगलेलं पाहिलं नाही. अनेक संकट आलीत पण माँसाहेबांसारख्याच रश्मी ठाकरे लढत राहिल्या असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. यावेळी रश्मी ठाकरेसुद्धा भावुक झालेल्या पाहायला मिळालं.