Breaking | अखेर मुलाने वडिलांची साथ सोडली, ठाकरे गटातील दिग्गज नेत्याच्या मुलाचा शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश

राज्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरु असताना उद्धव ठाकरे गटातील दिग्गजाच्या मुलाने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Breaking | अखेर मुलाने वडिलांची साथ सोडली, ठाकरे गटातील दिग्गज नेत्याच्या मुलाचा शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 9:58 PM

मुंबई | राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांना वाढता पाठींबा मिळताना दिसतोय. दररोज एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी बंड पुकारलं. त्यांना अनेक आमदारांनी पाठिंबा दिला. या बंडामुळे राज्यात सत्तांतर झालं. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर खासदारही शिंदे यांच्यासोबत गेले. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी खासदार गजानन कीर्तीकर हे देखील शिंदेसोबत गेलं. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही शिंदेना मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला शिवसेना अशी ओळख मिळाली.

त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरुच आहे. या दरम्यान आता महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटातील दिग्गज नेत्याच्या मुलाने शिंदेच्या शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पर्यायाने ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा पुत्र भूषण देसाई याने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई याने मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं.

भूषण देसाई यांचा शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश

भूषण देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

भूषण देसाई यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा रिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन इथे पार पडला. “मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सुरु असलेली वाटचाल आणि राज्यातील महायुतीचे सरकार करत असलेल्या कामामुळे प्रभावित झाल्यामुळेच आपण पक्षप्रवेश करत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी आहे”, अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली.

सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

“माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेदशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील 5 दशकांपासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहिल. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचं गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे”, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.