AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबादास दानवे यांना निलंबित करताच उद्धव ठाकरे संतापले, विरोधी पक्षनेत्यांविरोधात षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप

"एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं. त्याचा निर्णय घेणं अपेक्षित असतं. निलंबन करण्याचा अधिकार हा अध्यक्ष किंवा सभापतींचा असतो. पण त्यासाठी एकतर्फी निर्णय, एका कुणाकडून मागणी झाली, म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अंबादास दानवे यांना निलंबित करताच उद्धव ठाकरे संतापले, विरोधी पक्षनेत्यांविरोधात षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांचा फोटो
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 3:17 PM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या सभापतींनी घेतलेल्या या निर्णयावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवन परिसरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अतिशय तिखट शब्दांत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना एक षडयंत्र रचत निलंबित करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. “खरंतर अंबादास दानवे यांना भूमिका मांडण्यासाठी संधी द्यायला हवी होती. त्यांना वेळ द्यायला हवी होती पण वेळ देण्यात आली नाही. आम्हाला कुणाला बोलू दिलं गेलं नाही. जणू काही सर्व ठरवूनच षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं आहे, हे असं कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झाला असेल. हा सर्व अन्याय महाराष्ट्राची जनता डोळे उघडून पाहते आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

“आपल्याला कल्पना आहे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित केलं गेलं आहे. खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर, माझ्या बाजूला दोन्ही विधीमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं. त्याचा निर्णय घेणं अपेक्षित असतं. निलंबन करण्याचा अधिकार हा अध्यक्ष किंवा सभापतींचा असतो. पण त्यासाठी एकतर्फी निर्णय, एका कुणाकडून मागणी झाली, म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे, हा लोकशाहीच्या विरोधातील निर्णय आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

“आमचा काल शिक्षक-पदवीधर निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे, तो विजय झाकाळून टाकण्यासाठी त्यांनी निलंबनाचा निर्णय घेतला. म्हणजे आमच्या विजयाच्या बातम्या दाबून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसंच जो बोगस अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे, त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली आहे. लोकांना सुद्धा कळलं आहे की, ही धूळफेक आहे. निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं हे गाजर आहे. त्याची चिरफाड करायला अनेक तज्ज्ञांनी आणि आम्ही सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला एका वेगळ्या मुद्द्याकडे न्यायचं असा प्रयत्न सुरु आहे. म्हणून आकसाने विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलं गेलं आहे. याचा आम्ही निषेध करतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“संपूर्ण जनेतेने हे पाहावं, तुमचा आवाज मांडताना विरोधी पक्षाला निलंबित केलं जात असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? वातावरण खूप वाईट आहे. या निमित्ताने मी परत एकदा सांगतो, येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही एकत्र एका ताकदीने लढवू”, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.